Havaman Andaj
पुढील चार दिवसांत दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची तर राज्याच्या उर्वरीत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडूवर हवेच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आठ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या याचा वेग वाढून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून आकाश ढगाळ राहील.पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान सिंधुदुर्ग,कोल्हापूर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी
हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचा गारवा कमी होण्याचा आणि दुपारच्या तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही.
दरम्यान, रविवारी राज्यात सर्वाधिक तापमान डहाणू मध्ये ३६.४ अंश सेल्सिअस होते.तर यवतमाळमध्ये किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.