ST Digital Ticket
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होतात.परंतु,आता एसटी महामंडळाने ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.नव्या यंत्रांमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोखीने व्यवहार टाळून यूपीआय, क्यूआर कोडद्वारे ‘डिजिटल पेमेंट’चा वापर करून तिकीट काढता येणार आहे.
प्रत्येक क्षेत्रात रोकडरहित व्यवहार व्हावेत यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.त्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे.प्रवासादरम्यान प्रवाशांना फोन पे, गुगल पेद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.वाहकाकडील अँड्रॉइड तिकीट यंत्रावरील क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे.परिणामी, सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टळू शकणार आहेत.
हे पण वाचा:- आता या लोकांचा एसटीचा मोफत प्रवास बंद,शासनाचा नवीन निर्णय जाहीर!
अशी असेल यंत्रणा
●वाहकाकडे अँड्रॉइड तिकीट यंत्र असेल व त्यावर क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे समजतील.
●प्रवाशांना फोन पे,गुगल पे याचा वापर करून तिकीट काढता येईल.
●यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टळू शकतील.
एसटी महामंडळातील सर्व वाहकांसाठी नवीन सुविधा असलेली तिकीट यंत्रे घेण्यात आली आहेत.यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या(ST Digital Ticket) माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट विक्री सुरू झाली आहे. डिजिटल तिकीट प्रणालीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा,असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.