Royal Enfield Shotgun 650
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.गेल्या अनेक दशकांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या रॉयल एनफिल्ड कंपनीने एक नवीन आणि जबरदस्त बाईक लाँच केली आहे. कंपनीने रॉयल एनफिल्ड शॉटगन 650(Royal Enfield Shotgun 650) ही बाईक लाँच केली आहे.लवकरच भारतात ही बाईक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या बाईक मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत जे तुमचा रायडिंगचा आनंद नक्कीच वाढवतील.
Table of Contents
शॉटगन 650 बाईक ची वैशिष्ट्ये
•सदरची बाईक BS6 ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध असणार आहे.
•ही बाईक चार आकर्षक रांगांमध्ये उपलब्ध असणार आहे.ज्यामधे स्टॅन्सिल व्हाइट,प्लाझ्मा ब्ल्यू,ग्रीन ड्रिल आणि शीटमेटल ग्रे या रंगांचा समावेश असणार आहे.
•या बाईकमध्ये १८ इंच फ्रंट आणि १७ इंच रियर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत ज्यामुळे गाडीचा लूक आकर्षक आणि आकारदार दिसतो.
•या बाईक मध्ये Tubeless आणि Radial टायरचा वापर करण्यात आला आहे.
•आरामदायक सस्पेंशन मुळे खड्ड्यांचा धक्का बसत नाही.
•टायर साठी पुढे आणि पाठीमागे दोन्ही ठिकाणी ABS डिस्क ब्रेक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
पॉवरफुल्ल इंजिन आणि परफॉर्मन्स
रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 या बाईक मध्ये 648cc एअर कुल्ड SOHC चे पॉवरफुल इंजिन वापरण्यात आले आहे.हे इंजिन 52nm टॉर्क आणि 47.65ps पॉवर जनरेट करते.तसेच या बाईक मध्ये 6 स्पीड गिअर बॉक्स वापरण्यात आला आहे.यामुळे गाडीचा वेग खूप जास्त असणार आहे.
आधुनिक फिचर्स Royal Enfield Shotgun 650
- डिजिटल टॅकोमीटर
- एलईडी हेडलाईट
- यूएसबी चार्जिंग पोर्ट
- ट्रिपर नेव्हीगेशन
- डिजी एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- रॉयल एनफिल्ड विंगमॅन सपोर्ट
किंमत किती असेल?
रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 ही बाईक अजून भारतात लाँच करण्यात आलेली नाही.लवकरच भारतीय बाजारात ही बाईक लाँच केली जाणार आहे.या बाईकची अंदाजे किंमत 3.5 लाख ते 3.8 लाख रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.