Namo Shetkari Yojana 2nd Installment Date
राज्यात सरकारच्या वतीने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला गेला आहे.आता नवीन वर्षाची भेट म्हणून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता वितरित केला जाणार असल्याचे सरकारने घोषित केले आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये प्रत्येकी २००० याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जाणार आहेत.या योजनेचा ९२ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.सरकारच्या वतीने या ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता दोन हजार रुपये जमा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधीन राहून जुलै महिन्यात राज्यात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे.पी एम किसान योजनेचे लाभार्थी असलेले शेतकरीच या योजनेचे लाभार्थी आहेत.त्यामुळे पी एम किसान योजनेसाठीच्या अटी व शर्ती या योजनेसाठी लागू आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ ऑक्टोबर २०२३ रोजी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.राज्यातील जवळपास ८६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला.तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा देखील १५वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला.
त्यामुळे राज्यातील शेतकरी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०२४ महिन्यातील पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळू शकणार आहे.तसेच विश्वसनीय सूत्रांकडून असे देखील वृत्त समजते आहे की दोन्ही योजनांचे पैसे एकाच दिवशी वितरित केले जाऊ शकतात.
देशातील २०२४ मधील लोकसभा निवडणुका लक्षात घेता पीएम किसान सन्मान निधीची रक्कम ही ६ हजार रुपयांवरून ८ हजार किंवा १२ हजार रुपये देखील केली जाऊ शकते.त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १८ हजार रुपये मिळू शकणार आहेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला नाही अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर आपली नोंदणी करायची आहे.आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत ई केवायसी केलेली नाही त्यांनी देखील पुढील हप्ता मिळण्यासाठी आपली ई केवायसी करून घ्यायची आहे.
शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी.जर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाणून आपले नवीन बचत खाते उघडायचे आहे.नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.