Electronic Soil
भारतातील काही शेती शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनिक माती (Electronic Soil) विकसित केली आहे.शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार या मातीमध्ये सरासरी १५ दिवसांमध्ये बार्लीच्या झाडांची वाढ ५० टक्के वाढू शकते.या तंत्रज्ञानाला हायड्रोपोनिक्स म्हणून ओळखले जाते.हायड्रोपोनिक्स ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये मातीविरहित शेती पिके घेतली जातात.यामध्ये पिकांच्या वाढीसाठी मातीची गरज पडत नाही.या पद्धतीमुळे १५ दिवसात पीक दुप्पट वाढणार आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे.याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
Electronic Soil 15 दिवसांत पिकाची दुप्पट वाढ
स्वीडनमधील लिंकोपिंग युनिव्हर्सिटी चे सहयोगी प्राध्यापक एलेनी स्टॅव्ह्रिनिडो यांनी सांगितले की जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्व लोकांच्या अन्नाची गरज पारंपारिक शेती करून भागणार नाही.तसेच हवामानातील होणारे बदल देखील पिकांच्या उत्पादनावर परिणाम करीत आहेत.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे आवश्यक आहे.त्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरांमध्ये देखील नियंत्रित वातावरणात पिके घेता येणार आहेत.
लिंकिपिंग युनिव्हर्सिटीच्या टीमने हायड्रोपोनिक्स शेतीसाठी एक विद्युत प्रवाहकीय शेतीचा थर विकसित केला,त्याला ते ई-सॉईल म्हणतात.प्रोसेडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये एका संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.या संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की विद्युत वाहक मातीमध्ये उगवलेली बार्लीच्या रोपांची १५ दिवसांमध्ये ५० टक्के वेगाने वाढ झाली आहे. यामध्ये बार्लीच्या रोपांची मुळे विद्युतदृष्ट्या उत्तेजीत करण्यात आली होती.
हे पण वाचा:- नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात!
हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?
माती विरहित शेती या तंत्रज्ञानाला हायड्रोपोनिक्स असे म्हटले जाते.यामध्ये शेती पिकांच्या वाढीसाठी किंवा उगविण्यासाठी कसल्याही प्रकारची माती वापरली जात नाही.पिकांना फक्त पाणी,पोषक द्रव्ये देऊन वाढ केली जाते.यासाठी पिकांना सब्सट्रेटची आवश्यकता असते.
भारतात सध्या चारा तयार करण्यासाठीच ही पद्धत वापरली जात आहे.हायड्रोपोनिक्स पद्धतीच्या माध्यमातून जनावरांसाठी मकापासून चारा तयार करण्यात येत आहे. परंतु अलीकडेच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा आणि विद्युत प्रवाह वापरून बार्लीच्या रोपांची लागवड करता येते तसेच त्याचा वाढीचा दर देखील चांगला असतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.