देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याच्या गुलाबी थंडीची लाट पसरली आहे.तसेच दाट धुक्यांचे देखील प्रमाण वाढले आहे.हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे.दरम्यानच्या कालावधीत मागील काही दिवसांपासून पश्चिमेकडून वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि पूर्वेकडील वाऱ्यांमुळे देशातील अनेक भागांमध्ये दाट धुके पडत आहेत.तसेच याचाच परिणाम म्हणून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये महाराष्ट्र,छत्तीसगढ,झारखंड,बिहार आणि उत्तरप्रदेश, केरळ,तामिळनाडू आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे.
२ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यानच्या कालावधीत पंजाब, हरियाणा,उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील काही जिल्ह्यांमध्ये दाट धुके देखील पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.याचा फटका रब्बी पिकांना बसणार असल्याने शेतकरी वर्ग मात्र चिंतेत आहे.
हे पण वाचा:- जानेवारी ते मार्चच्या दरम्यान कशी असेल पावसाची स्थिती, हवामान विभागाचा काय आहे अंदाज!
महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस
राज्यातील परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपला हवामान अंदाज सांगितला आहे.त्यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात ३ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान संपूर्ण राज्यभर ढगाळ वातावरण राहणार आहे.या कालावधी दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
पंजाबराव यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भातील नागपूर,बुलढाणा,अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मात्र चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील देखील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडणार आहे.
३ ते ९ जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण
पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज देताना सांगितले की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ३ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण राहणार आहे.तसेच दिवसा मोठ्या प्रमाणात दाट धुके पाहायला मिळणार आहेत.राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतर भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार नसल्याचा अंदाज पंजाबराव यांनी सांगितला आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.आणि आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.