Bater Farming
भारत हा कृषीप्रधान देश आहे.त्यामुळे देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे.शेतीच्या सोबतच जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो.शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायामधून देखील चांगल्या प्रकारची कमाई देखील होत आहे.तसेच जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करण्यासोबतच कुक्कुटपालन व्यवसाय देखील केला जातो.
शेतकरी कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून कोंबडी पालन आणि बदक पालन करतात.यातून देखील शेतकऱ्यांना कमाई होते.परंतु शेतकऱ्यांनी कोंबडी पालन आणि बदक पालन करण्यापेक्षा जपानी बटेर अर्थात तीतर पक्षांचे पालन केल्यास कमी खर्चात जास्त कमाई करता येणार आहे.
या क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितले आहे की ब्रॉयलर कोंबडी पालन करण्यापेक्षा जपानी बटेर पक्षांचे पालन केल्यास कमी खर्चात चांगले पैसे कमावता येणार आहेत. ब्रॉयलर कोंबडी पालनच्या तुलनेत बटेर पक्षांना कमी जागा तसेच कमी खर्च लागतो.त्याचबरोबर या पक्षांच्या आहारावर देखील कमी खर्च करावा लागतो.
जपानी बटेर पक्षाला कमी आहार आणि कमी पाणी तसेच कमी जागा लागत असल्याने उत्पादन खर्च कमी होणार आहे.पर्यायाने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. त्यामुळे बटेर अर्थात तीतर पालन शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
तज्ञांनी सांगितल्या प्रमाणे या पक्षाच्या पालनासाठी खूप कमी गुंतवणूक लागणार आहे.तसेच यामध्ये जोखीम खूपच कमी असणार आहे.त्यामुळे खर्च कमी आणि जोखीम देखील कमी असल्याने मिळणारा नफा देखील अधिक असणार आहे.या जपानी बटेर पालनामधून नाही म्हणले तरी ५० टक्के नफा सहज कमावता येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
बाजारात या पक्षाला मागणी देखील चांगली आहे.कोंबडी आणि बदक यांच्या मांसापेक्षा बटेर पक्षाचे मांस चवीला अधिक रुचकर आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.तसेच या पक्षाच्या मांसाला चांगली मागणी असल्याने आणि आरोग्यवर्धक असल्याने बाजारात चांगला भाव देखील मिळत आहे.
या पक्षांचे पालन भारतामध्ये करणे सोपे आहे.तज्ञांच्या मतानुसार जपानी बटेर पक्षी जन्मापासून पाच आठवड्यांमध्ये विक्रीसाठी तयार होतात.त्यामुळे जवळपास एका महिन्यात या पक्षांची विक्री केली जाऊ शकते.बाजारात या पक्षाला प्रती नग ७० ते ८० रुपये दराने विक्री केली जाऊ शकते.मात्र या पक्षाला तयार करण्यासाठी ३० ते ४० रुपये एवढा खर्च येतो.त्यामुळेच या व्यवसायात ५० टक्के नफा मिळवला जाऊ शकतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट द्या.