Rain Alert | आता तरी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार असे वाटत असतानाच परत एकदा हवामानामध्ये बदल घडून आलेला आहे.संपूर्ण महाराष्ट्राभर ढगाळ हवामान आहे.काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झालेली आहे.असेच हवामान पुढील दोन ते तीन दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
देशासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान आहे तसेच आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नाशिक,अहमदनगर,छत्रपती संभाजी नगर,जळगाव, जालना,सातारा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज सांगितला आहे.विदर्भ आणि कोकण भागामध्ये पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
या जिल्ह्यांमध्ये बरसला पाऊस
मागील २४ तासांमध्ये सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड आणि पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.तसेच गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू आणि चेन्नई मध्ये मुसळधार पाऊस होऊन तेथील जनजीवन विस्कळित झालेले आहे.मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नई मध्ये २४ तासांमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस पडला होता.
कशामुळे पडतोय अवकाळी पाऊस?
सध्या मान्सून संपला असला तरी देखील पडणारा पाऊस हा वेस्टर्न डिस्टर्बन्स यांमुळे पडत असल्याचे सांगितले जात आहे.वेस्टर्न डिस्टर्बन्स हे एक प्रकारचे वादळ आहे.हे वादळ भुमध्य समुद्र आणि कॅस्पियन समुद्र या ठिकाणी तयार होऊन ते वाहत वाहत भारतच्या दिशेने येते.पावसाळ्याच्या व्यतिरिक्त उत्तर आणि पश्चिम भारतात जो पाऊस होतो तो याच वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे होतो.याचा फायदा रब्बी पिकांना होतो.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील दिला आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.त्यामुळे येणारे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत.शेतकऱ्यांनी आपल्या पिकांमध्ये फवारणी करावी की नाही?पिकांना पाणी द्यावे की नाही अशा शंकांसाठी तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढील योग्य तो कार्यवाही करावी.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट द्या.