Agriculture News: देशासह राज्यातील शेतकऱ्यांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे.ग्लोबल वॉर्मिंगचा अवकाळी पाऊस,गारपीट,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.याचा परिणाम शेती पिकांच्या उत्पादनावर होत असल्याने शेतकरी हाताश होत आहेत.मागील वर्षीही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे.
हवामान बदलांमुळे मागील वर्षी अर्थातच २०२३ या खरीप हंगामात मान्सूनचे उशिरा आगमन झाले त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या.तसेच संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. देशातील त्याचबरोबर राज्यातील कार्बन उस्तर्जनाचे प्रमाण वाढल्याने हवामान बदलासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना राबविणे खूप आवश्यक आहे.त्यासाठी शासन कटिबद्ध आहे.जर कार्बन उत्सर्जन कमी करायचे असेल तर बांबू लागवड हा एक उत्तम पर्याय ठरेल असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या शाश्वतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मत व्यक्त केले आहे. राज्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांबूची लागवड ही ऊस पिकापेक्षा फायद्याची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे.
यासाठी राज्य सरकारच्या वतीने बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यंत्र्यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देखील देण्यात येणार आहे.यासाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान दिले जात असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी बांबू शाश्वतता शिखर परिषदेत बोलताना दिली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.
हे पण वाचा:- अवकाळी पाऊस अजून किती दिवस?आणि कुठे बरसणार?जाणून घ्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज!