Land Record News
वडिलोपार्जित शेतजमीन १०० रुपयात करा आपल्या नावावर कसा अर्ज करायचा घ्या जाणून.
Land Record News:- वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे वारसांसाठी डोकेदुखी ठरत असते.अशा परिस्थितीमध्ये ही प्रक्रिया खर्चिक ठरत असते.मात्र आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत आणि फक्त १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर च्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची मोहीम भूमिअभिलेख खात्यामार्फत राबविली जात आहे.
जमिनीचे वारसा हक्काने हस्तांतरणाची वाटणी पत्र (Land For Sale) आता फक्त १०० रुपयात करणे शक्य झाले आहे.त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते.परंतु त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने सदरच्या परिपत्रकात खूप सारे बदल करण्यात आले आहेत.
वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे,आईकडून मुलीकडे किंवा मुलाकडे शेतजमीन नावावर (land for sale)हस्तांतरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याने शेतकऱ्यास आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते.परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे नवीन आदेश काढण्यात आले आहेत.हिंदू कुटुंब पद्धतीनुसार वडील अथवा आईची शेतजमीन(land for sale)मुलाच्या किंवा मुलीच्या नावे वाटप पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ नुसार संबंधित तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत.
कशाप्रकारे अर्ज करायचा ?
शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्जदाराने आपले नाव, सहधारकांचे नाव व पत्ता, अर्जदाराशी नाते, शेतजमिनीचा वर्ग,जिरायत/बागायत जमिनीचा तपशील,एकूण गटाचे क्षेत्र,१०० रुपयांच्या स्टॅम्पवर आपसात वाटणी केलेले क्षेत्र, त्याच्या चतु:सीमा व इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकांची स्वाक्षरीसह संमती आदी बाबींची पूर्तता केल्यास विभाजनाचे काम तातडीने करून मिळेल.
(Land for sale) या अधिकाराचा वापर करून १०० रुपयाच्या स्टॅम्प वर हे अधिकृत वाटणी पत्र करण्यास काहीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ नुसार रक्तनात्यातील शेतजमीन हस्तांतरणाची(Land for sale) प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.