Crop Loan
Crop Loan:- शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते.शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो.शेतीच्या मशागतीसाठी आजच्या काळात वाढलेला खर्च तसेच बी बियाणे, खते,औषधे यांच्या वाढत चाललेल्या किंमती शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय होत चालल्या आहेत.
काय असते पीक कर्ज? What is Crop Loan
या साठी शेतकऱ्याला गरज पडते पीक कर्जाची(Crop Loan) हे पीक कर्ज Crop Loan आता शेतकऱ्यांना बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात आले आहे.याची वाटप कधी पासून होणार आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.
व्याजदर किती असतो? Crop Loan Interest Rate
शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज (Crop Loan)
शेतकऱ्यांना २०१९ पासून १ लाख रुपये ते ३ लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज(Crop Loan) हे बिगर व्याजी स्वरूपात दिले जात आहे.१ लाख रुपयांपर्यंत चे पीक कर्ज हे राज्य शासनातर्फे बिनव्याजी दिले जाते.
Table of Contents
मर्यादा किती असते? Crop Loan Limit
तसेच १ लाख ते ३ लाख रुपांपर्यंत चे पीक कर्ज हे राज्य शासन आणि केंद्र शासन च्या माध्यमातून बिनव्याजी दिली जातात.शेतकऱ्यांना या पीक कर्जाचे (Crop Loan) वाटप राष्ट्रीयकृत बँका,सहकारी बँका,ग्रामीण बँका,खाजगी बँका च्या मार्फत केले जाते.
शेतकऱ्यांना काय फायदा होतो? Crop Loan Benefits
शेतकऱ्याने आपले पीक कर्ज हे विहित मुदतीत परतफेड केल्यास पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम शासन त्यांना अनुदान स्वरूपात देते.पीक कर्जाची(Crop Loan) परतफेड ही वाटप केलेल्या तारखेपासून १ वर्षाच्या आत केल्यास त्या शेतकऱ्याला पुन्हा पीक कर्ज(Crop Loan) वाटप केले जाते.तसेच जे शेतकरी आपले पीक कर्ज(Crop Loan) थकीत ठेवतात अशा शेतकऱ्यांना परत वाटप करण्यास बँका टाळाटाळ करतात.
कधीपासून होणार पीक कर्जाचे वाटप?(Crop Loan)
शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. सदर कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका,सहकारी बँका,ग्रामीण बँका,खाजगी बँकाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे.
हे पण वाचा:- ग्राम पंचायत नुसार घरकुल यादी जाहीर,आजच डाऊनलोड करा!
तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज(Crop Loan) विहित मुदतीत परतफेड केले असेल अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिकच्या माहिती साठी आपल्या जवळील बँकेत जाऊन चौकशी करावी.
अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुप ला जॉइन व्हा.