Solar Rooftop scheme
Solar Rooftop Scheme 2023
सरकारमार्फत देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात.अशीच एक भन्नाट योजना सरकारने सुरू केली आहे.ज्यामुळे नागरिकांची लाईट बिलापासून सुटका होणार आहे.सरकारने घरावर सौर पॅनल बसविण्यासाठी नागरिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर योजनेमुळे देशातील होणारे प्रदुषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे.प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकार हरित ऊर्जेचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे.
Table of Contents
सौर पॅनल चे फायदे
Solar Rooftop Scheme
सदर योजनेअंतर्गत नागरिकांना आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.सौर पॅनलचा महत्वाचा फायदा म्हणजे नागरिकांना कसलेही लाईट बिल येत नाही. सौर पॅनलचे आयुष्यमान हे 25 वर्ष असते.त्याकरिता कसलेही शुल्क द्यावे लागत नाही.
सुरुवातीला सौर पॅनल बसविण्याचा खर्च 4 ते 5 वर्षात निघून जातो.त्यामुळे पुढील 20 वर्ष मोफत वीज मिळते.
ही हरित ऊर्जा असल्याने नागरिकांना यापासून कसलाही धोका होत नाही.
हे पण वाचा:- ग्रामपंचायत नुसार नवीन घरकुल यादी जाहीर, आजच डाऊनलोड करा!
सरकार किती अनुदान देते?
केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून सदर योजनेसाठी अनुदान दिले जाते.सौर पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदानाची रक्कम ठरविली जाते.
3kw क्षमतेच्या सौर पॅनल साठी सरकार 40% अनुदान देते.तसेच 3kw ते 10kw क्षमतेच्या सौर पॅनल साठी 20% अनुदान दिले जाते.
सौर पॅनलची किंमत किती असते?
1kw ते 3kw. ₹37000 प्रती Kw
3kw ते 10 kw ₹39800 प्रती kw
10kw ते 100kw. ₹36500 प्रती kw
100kw ते 500kw. ₹34900 प्रती kw
आवश्यक कागदपत्रे
नागरिकांनी सर्वप्रथम आपल्या घरातील वीज मागणीचा विचार करून आवश्यक क्षमतेचे सौर पॅनल बसविणे गरजेचे आहे.
1 किलोवॅट सौर पॅनल साठी सुमारे 10 चौरस मीटर क्षेत्र आवश्यक आहे.
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर चालू वीज बिल आणि उत्पन्नाचा दाखला आणि ज्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवायचे आहे त्या छताचा फोटो देखील आवश्यक आहे.
अर्ज कुठे करायचा?Solar Rooftop scheme
घराच्या छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी नागरिकांनी जवळच्या डिस्कॉम किंवा पॉवर ऑफिसशी संपर्क साधून आपला अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.
अतिरिक्त माहितीसाठी संबंधीत डिस्कॉमशी संपर्क साधावा किंवा MNRE च्या टोल फ्री क्रमांक 1800-180-3333 वरती संपर्क साधून योजनेशी निगडित प्रश्नांची विचारपूस करावी.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.