Tractor Scheme
Tractor Scheme
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांसाठी शासनाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक मागास मराठा तरुणांना अर्थसहाय्य देण्यात येते.
Table of Contents
महामंडळाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सुरुवातीला वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना(IR -1) अंतर्गत 10 लाख रुपये कर्ज मर्यादा होती.आता याची मर्यादा वाढवून 15 लाख रुपये करण्यात आली आहे.याची अंमलबजावणी दसऱ्यापासून करण्यात येणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आहेत.राज्यात मागील काही दिवसांपासून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेला स्थगिती देण्यात आली होती.परंतु अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत नवीन अपडेट दिले आहे.त्यांनी सांगितल्या प्रमाणे राज्यात ट्रॅक्टर खरेदी योजनेला पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.यासाठी महामंडळाने महिंद्रा आणि एस्कॉर्ट टर्बो या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.Tractor Scheme
ट्रॅक्टरसाठी मिळणार किमतीच्या 50 टक्के व्याज परतावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी साठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50 टक्के व्याज परतावा दिला जाईल.या योजनेच्या जनजागृती साठी महामंडळाच्या वतीने जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
ट्रॅक्टर खरेदी योजना पात्रता आणि निकष
१.ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी व्यक्तींसाठी आहे.
२.अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
३.अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा जास्तीत जास्त 8 लाख रुपये असावी.
४.अर्जदार हा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
५.अर्जादरकडे किमान दहा हजार रुपयांचे स्वयंरोजगार प्रकल्प असावे.
हे पण वाचा:- प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढणार!
अण्णासाहेब पाटील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळा कडून योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR -1) अंतर्गत कर्ज मर्यादा ही 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे.तसेच तीन लाख रुपयांच्या मर्यादेत वाढ करून ती 4.5 लाख करण्यात आली आहे.आणि कर्ज कालावधी 5 वर्षांहून 7 वर्ष करण्यात आला आहे.तसेच वयाची अट देखील 60 वर्षे करण्यात आली आहे.Tractor Scheme
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.