Agriculture News
शेतकरी कुटुंबातील व्यक्तींसाठी ही बातमी खूप कामाची असणार आहे.शेतीमध्ये कोणतेही पीक घेतल्यानंतर तण नियंत्रण करणे खूप गरजेचे असते.त्यामुळे पिकांची अधिक जोमाने वाढ होऊन उत्पादनामध्ये देखील चांगली वाढ होते. जर पिकातील तणाचे नियंत्रण केले नाही तर याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर दिसून येतो.त्यामुळे तण नियंत्रण खूप गरजेचे आहे.
शेतातील उगवलेले तण अन्न,मातीतील पोषक द्रव्ये आणि पाणी यासाठी मुख्य पिकासोबत स्पर्धा करते त्यामुळे पिकाचे उत्पादन घटले जाते.यामुळे पिकांची नीट वाढ होत नाही,प्रामुख्याने याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर दिसून येतो.अलीकडे काँग्रेस गवत अर्थात गाजर गवत हे मोठ्या प्रमाणावर सगळीकडे आढळून येते.या गवताचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना पडलेला असतो.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून काँग्रेस गवत पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी तज्ञांनी काय सल्ला दिला आहे याची माहिती जाणून घेणार आहेत.कृषी तज्ञांनी काँग्रेस गवत नियंत्रण करण्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे याची माहिती दिली आहे.तज्ञांनी सांगितलेली फवारणी केल्यास काँग्रेस गवत नियंत्रण करणे सोपे होणार आहे.
काँग्रेस गवत नियंत्रण करण्यासाठी कोणती फवारणी करावी?
कृषी तज्ञांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार काँग्रेस गवत अर्थात गाजर गवत नियंत्रण करण्यासाठी Oxyfluorfen 23.5% EC हा घटक असलेले कोणतेही तणनाशक फवारणी करावे लागेल.Goal नावाने ओळखल्या जाणारे तणनाशक फवारणी करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी सांगितला आहे.
कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस गवताचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.त्यामुळे कांदा पीक लागवड केल्यानंतर ४८ तासांच्या आत Goal या तणनाशकाची फवारणी केल्यास तण नियंत्रण करण्यासाठी खूप मदत होते.
तणनाशकाची कांद्यावर फवारणी करण्यासाठी Goal या तणनाशकाचे प्रमाण १५ लिटर पंपासाठी १० मिली एवढे वापरणे आवश्यक आहे.त्यामुळे गाजर गवतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले जाऊ शकते.या तणनाशकाच्या वापरामुळे गाजर गवत १०० टक्के नियंत्रित करता येते. तसेच हे तणनाशक बीजनाशक म्हणून देखील कार्य करते ज्यामुळे तण उगवण्यापूर्वीच त्याचा नाश केला जातो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.