Bharat Rice :- केंद्र सरकारची योजना,आता 50 रुपये किलोचा तांदूळ मिळणार 25 रुपये किलो दराने,जाणून घ्या ‘भारत तांदुळ’ या योजनेविषयी!

Spread the love

Bharat Rice
देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.देशात लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले जात आहे.देशातील नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेच्या अंतर्गत फक्त २५ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार आहे.भारत (Bharat Rice)नावाच्या ब्रँडने या तांदळाची विक्री केली जाणार आहे.

केंद्र सरकारने मागील काही दिवसांपूर्वी स्वस्त धान्य योजनेच्या अंतर्गत भारत ब्रँडच्या चना डाळी आणि पीठ बाजारात आणले होते.या खाद्यपदार्थांची यशस्वी विक्री संपूर्ण भारतभर करण्यात आली होती.या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने केंद्र सरकारने भारत ब्रँडच्या तांदळाची विक्री करण्याचे ठरविले आहे.हा तांदूळ सर्वसामान्य नागरिकांना २५ रुपये प्रति किलो दराने खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून होणार विक्री

स्वस्त धान्य योजनेच्या अंतर्गत भारत ब्रँडच्या तांदळाची विक्री ही राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड), राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ), आणि केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या दुकानांमधून केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे.त्यामुळे आता लवकरच नागरिकांना हा २५ रुपये किलोचा तांदूळ मिळणार आहे.

हे पण वाचा:- तुमच्या कामाची बातमी,तुम्हाला एलपीजी गॅसवर सबसिडी हवी असेल तर या तारखेपर्यंत ई केवायसी करा, नाहीतर मग सबसिडी विसरा!

तांदूळ साठवणूक केल्यास होणार कठोर कारवाई

सबंध देशभरात बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. बासमती तांदळाचे दर ५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.सरकारच्या भारत ब्रँड तांदूळ योजनेच्या माध्यमातून हाच तांदूळ २५ रुपये किलोने विक्री केला जाणार आहे.केंद्र सरकार तांदळाच्या वाढत्या किंमतीवर आपले लक्ष ठेवून आहे.व्यापाऱ्यांकडून तांदळाची साठेबाजी करून तांदळाची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.या गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारने साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

‘भारत आटा’ आणि ‘भारत डाळ’ला चांगला प्रतिसाद

केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील काही दिवसांपूर्वी गहू आणि चना डाळीच्या वाढत्या किंमतीमुळे ‘भारत आटा’ योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी गव्हाच्या आट्याची २७.५० रुपये किलो दराने विक्री केली गेली होती.तसेच दिवाळीमध्ये ‘भारत डाळ’ अंतर्गत चना डाळीची ६० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री केली होती.या योजनेला ग्राहकांनी चांगली पसंती दिली होती.त्यामुळे आता भारत तांदूळ (Bharat Rice)नावाने तांदळाची विक्री केली जाणार आहे.

केंद्र सरकारने भारत आटा,डाळ,तांदूळ आणि कांदा यांची विक्री स्वस्त धान्य योजनेच्या अंतर्गत केली आहे.जेणेकरून देशातील नागरिकांना कमीत कमी किंमतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल.तसेच वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होईल.आशा आहे की केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील वाढत्या महागाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment