Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana
Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी,पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे.
Table of Contents
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वित्त मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन त्याला फळबाग,ठिबक/तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह,आधुनिक पेरणीयंत्रे(BBF),आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे योजनेच्या विस्तारित योजनेस शासन निर्णय काढून मान्यता देण्यात आली आहे.
काय आहे शासन निर्णय
Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या “मागेल त्याला फळबाग,ठिबक/तुषार सिंचन,शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण,शेडनेट,हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेस “छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना” असे नाव देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना पात्रता निकष Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana
•शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
•शेतकऱ्याकडे जमिनीचे आवश्यक कागदपत्रे असावीत जसे की ७/१२उतारा आणि ८अ उतारा.
•केंद्र सरकार,राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी या योजनेस पात्र नसतील.
हे पण वाचा:- राज्यातील नागरिकांना दिवाळीत भेटणार आनंदाचा शिधा,फक्त 100 रुपयांत मिळणार या सहा वस्तू!
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेचा उद्देश
•शेतकऱ्यांना वर नमूद केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज करता येणार आहे.
•शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये पारदर्शकता आणणे.
•एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ.
•शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवठा करणे.
•कृषी यांत्रिकीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ पुरविणे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.