तुम्हाला माहितीय का? घरात किती सोने ठेवता येते, नियमाचे उल्लंघन केल्यास आयकर विभागाची कारवाई!

Spread the love

Gold at Home Income Tax Rules
सोने हा जगातील मौल्यवान धातुंपैकी एक धातू आहे.भारतामध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.सोने खरेदी करून परिधान करणे प्रत्येकाची इच्छा असते.त्यामुळे सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. लग्नामध्ये किंवा इतर समारंभात सोने परिधान करणे सगळ्यांनाच आवडते.लग्नामध्ये वधूला किती सोने घालावे यासाठी देखील काही नियम आणि अटी आहेत.

एखाद्या व्यक्तीकडे किती सोने असावे यासाठी सरकारने काही नियम बनविले आहेत. त्यामुळे अधिकचे सोने बाळगणे देखील तुम्हाला महागात पडू शकते.भारतीय आयकर विभागाच्या नियमावली नुसार प्रयेक व्यक्ती किती सोने जवळ ठेवू शकते यासाठी काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

विवाहित महिला घरामध्ये किती सोने ठेवू शकते?
Gold at Home Income Tax Rules

भारतीय आयकर विभागाने आयकर चोरी रोखण्यासाठी नियम कडक केले आहेत.एखादी व्यक्ती आपल्या घरात किती सोने ठेवू शकते यासाठी देखील मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.प्राप्तिकर कायद्यानुसार एखादी विवाहित महिला आपल्या घरात जास्तीत जास्त ५०० ग्रॅम पर्यंत सोने स्वतःकडे ठेवू शकते.तर अविवाहित महिला जास्तीत जास्त २५० ग्रॅम सोने बाळगू शकते.याशिवाय पुरुष विवाहित असेल किंवा अविवाहित जास्तीत जास्त १०० ग्रॅम सोने स्वतःकडे बाळगू शकतो.जर तुमच्याकडे या मर्यादेपर्यंत सोने असेल तर तुम्हाला कोणतेही कागदपत्रे देण्याची गरज नाही.

हे पण वाचा:- तुमचे बँकेत खाते आहे,थांबा! हे काम करा नाहीतर भरावा लागेल २ हजार ते १० हजार रुपये दंड,जाणून घ्या सविस्तर!

मर्यादेपेक्षा जास्त सोने असल्यास काय कारवाई होते?

जर तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोने असेल तर तुम्हाला आयकर परतावा भरताना याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल.जर आयकर विभागाने छापा टाकल्यास तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सोने आढळून आल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून जप्त करण्यात येईल.त्यानंतर तुमच्या विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल केला जाईल.तुम्हाला तुमच्याकडील जप्त केलेले सोने वैध मार्गाने घेतल्याचे सिद्ध करावे लागेल नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

काय आहे आयकर विभागाचा सोन्यावरील कराचा नियम?

जर तुमच्याकडे असलेले सोने तुम्ही बचत केलेल्या पैशातून किंवा वारसा हक्काने तुम्हाला मिळालेले असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागणार नाही.तुमच्याकडे असलेले सोने तुम्ही कुठून घेतले? किंवा तुम्हाला कुठून मिळाले? याची माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सोने साठवणुकीबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.

कोणते सोने जप्त होते कोणते नाही?

वर नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत तुमच्याकडे सोने असेल तर ते आयकर विभागाकडून जप्ती केले जात नाही.त्यासाठी तुमचे सोने तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असणे गरजेचे आहे.परंतु तुमच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीचे सोने आढळून आल्यास आयकर विभागाकडून ते जप्त करण्यात येते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment