Dushkal Anudan 2023
Dushkal Anudan 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.पावसाळा सुरू असतानाही सरासरीच्या ४० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.अशा राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये ‘दुष्काळाचा ‘ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे. त्यात सोलापूर व जालना जिल्ह्यातील तालुक्यां प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे.
Table of Contents
पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, पावसाचा खूप दिवसांचा खंड,जमिनीतील पाणीपातळीत घट,पिकपेरा व अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, संपूर्ण पिके वाया जाणे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्त्रोताची सद्यःस्थिती अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भातील ‘ट्रिगर-टू‘ लागू करण्यात आला आहे.
दरम्यान,खरीप २०२३ हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन ‘महा-मदत‘ प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर-टू लागू झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र, नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या ‘महा-मदत’ ॲपचा वापर करावा लागणार आहे.
हे पण वाचा:- नमो शेतकरी योजनेसाठी १७२० कोटी रुपये मंजूर
त्यानुसार दुष्काळ कशा स्वरूपाचा आहे, याचा अहवाल तयार होईल. त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर होईल. ही प्रक्रिया आता सुरू होणार असून, त्याचा अहवाल ऑक्टोबरअखेरीस शासनाला सादर होईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाणार आहे.
कोण कोणत्या तालुक्यांचा समावेश?Agricultural Drought Maharashtra
उल्हासनगर (जि. ठाणे), शिंदखेडा (जि. धुळे), नंदुरबार (जि. नंदुरबार), मालेगाव, सिन्नर, येवला (जि. नाशिक), बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे (जि. पुणे), बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (जि. सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा (जि. जालना), कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा (जि. सांगली), खंडाळा व वाई (जि. सातारा), हातकणंगले व गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), औरंगाबाद व सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर), अंबाजोगाई, धारूर व वडवणी (जि. बीड), रेणापूर (जि. लातूर), लोहारा, धाराशिव व वाशी (जि. धाराशिव), बुलडाणा व लोणार (जि. बुलडाणा).
शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळणार?Dushkal Anudan 2023
वर नमूद केलेल्या तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यास सदर तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायती शेतजमिनीसाठी ८,५०० रुपये,बागायती जमिनीसाठी १७,००० रुपये तसेच फळबाग आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.