Electricity Bill
मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची केवळ नोंदणी केल्यानंतर संबंधित वीजग्राहकांना तत्काळ दरमहा वीजबिल पाठविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.पुणे प्रादेशिक विभागांतर्गत महावितरणकडे घरगुती, वाणिज्यिक, औद्याोगिक,कृषी आणि इतर वर्गवारीत ८२ लाख ४८ हजार ३४७ मोबाइल क्रमांकांची आणि १४ लाख ९५ हजार ५६२ ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच ग्राहकाला मोबाईल क्रमांक आणि ई-मेलची नोंदणी करून दोन्हीद्वारे दरमहा वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे.
महावितरणने बिलप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू केली आहे. त्यासाठी मोबाइल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ मधील एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे छायाचित्र घेऊन केवळ एक ते दोन दिवसांमध्ये वीजबिल तयार करण्यात येत आहेत.वीजबिल तयार झाल्यानंतर ते मोबाइल किंवा ई-मेलद्वारे तत्काळ मिळविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.त्यासाठी केवळ मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
वीजबिलाच्या तारखेपासून सात कार्यालयीन दिवसांमध्ये तत्पर भरणा केल्यास एक टक्का सवलत दिली जाते. त्याची तारीख वीजबिलामध्ये नमूद केली जाते.एसएमएस किंवा ई-मेलद्वारे वीजबिल घेतल्यास ही सूट मिळवणे अधिक सोईचे आहे.मोबाइल क्रमांक नोंदणी केल्यास इतरही अनेक फायदे आहेत.
यात पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्ती,खंडित वीजपुरवठ्याची माहिती,रीडिंग घेतल्याची तारीख व वीजवापराच्या युनिटची संख्या,वीजबिलाची रक्कम,देय दिनांक,वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस ही माहिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे.त्यामुळे सर्व वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी करावी,असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
अशी करा नोंदणी
महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अॅपद्वारे मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची नोंदणी करण्याची सोय आहे.तसेच वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून टफऍ(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर एसएमएस केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री १९१२ किंवा १८००२१२३४३५,तसेच १८००२३३३४३५ क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलवर भेट द्या.