Fertilizer Subsidy
Fertilizer Subsidy
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या हंगामासाठी पिकांसाठी लागणाऱ्या खतांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम २०२३-२४ साठी खत विभागाने केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Table of Contents
या प्रस्तावाअंतर्गत रब्बी हंगामासाठी (०१.१०.२०२३ ते ३१.०३.२०२४ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
किती अनुदान देण्यात येणार?Fertilizer Subsidy
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार रब्बी हंगाम २०२३-२४ साठी नायट्रोजन खतासाठी 47.02 रुपये, फॉस्फेटिक खतांसाठी 20.82 रुपये,पोटॅसिक खतांसाठी 2.38 रुपये,आणि सल्फुरिक खतांसाठी 1.89 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येणार आहे.या अनुदान देण्याच्या निर्णयामुळे २०२३-२४ मध्ये देशाच्या तिजोरीवर २२,३०३ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी P&K खतांवरील अनुदान रब्बी हंगाम २०२३-२४ (०१.१०.२०३ ते ३१.०३.२०२४ दरम्यान लागू) साठी मंजूर दरांच्या आधारे प्रदान केले जाईल.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
१.या निर्णयामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल.
२.खतांच्या आणि कृषी मालांच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा सध्याचा कल लक्षात घेऊन P&K खतांवरील अनुदानाचे तर्कसंगतीकरण.
निर्णयाची पार्श्वभूमी
सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित भावाला 25 श्रेणीमधील P&K खत उपलब्ध करून देत आहे.P&K खतांवरील अनुदान ०१.०४.२०१० पासून एनबीएस योजनेद्वारे नियंत्रित केले जाते.आपल्या शेतकरी अनुकूल दृष्टिकोनाला अनुसरून,सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत P&K खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबध्द आहे.
हे पण वाचा:- राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना!
युरिया,डीएपी,एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि इतर कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेता,सरकारने फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर रब्बी हंगाम २०२३-२४ साठी ०१.१०.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीकरिता एनबीएस दर मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित दरांनुसार अनुदान दिले जाईल.त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध होतील.
शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.