Gharkul Yojana Today News
Gharkul Yojana Today News
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. लवकरच नवीन लाभार्थी निवडीची यादी प्रसिद्ध होणार आहे तसेच घरकुल बांधकामासाठी दिले जाणारे एक लाख वीस हजार रुपये अनुदान देखील वाढवून मिळणार आहे. आज आपण या लेखात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Gharkul Yojana Today News
देशातील प्रत्येक नागरिकाला जाण्यासाठी पक्के घर असावे ही केंद्र शासनाची तसेच राज्य शासनाची भूमिका आहे. आपल्या राज्यातील प्रत्येक बेघर तसेच कच्चे बांधकाम असणाऱ्या कुटुंबांना पक्के घर मिळावे यासाठी राज्य शासन उर्वरित घरकुलांच्या बांधकामांना प्राधान्य देईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.
हे पण वाचा:- नागरिकांना मिळणार लाईट बिलापासुन कायमची सुटका
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घरकुल यांच्या अनुदाना संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारला.
त्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री गिरीश महाजन म्हणाले की केंद्र सरकारने 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्य शासनाने देखील सदर योजना यशस्वी करण्याची जबाबदारी घेतली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाला 14 लाख 18 हजार 78 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 14 लाख 16 हजार 23 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 2055 घरकुलांना मंजुरी देण्याचे काम चालू असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी घरकुलांना जागा उपलब्ध करून देणे, अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करणे इत्यादी गोष्टींसाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
तर अशाप्रकारे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार लवकरच राज्यात नवीन घरकुलांना मंजुरी मिळेल तसेच अनुदानाच्या रकमेमध्ये देखील वाढ करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे अशी माहिती दिली.
असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.