Agriculture Scheme
कृषीप्रधान भारत देशाची अर्थव्यवस्था शेती आणि शेती उद्योगावर अवलंबून आहे.भारताच्या लोकशाहीची महसत्ता होण्याचे दिशेने वाटचाल सुरू आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून देखील आठ दशके पूर्ण होत आहेत.परंतु शेती आणि शेती व्यवसाय करण्यासाठी अनेक आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.अजून देखील देशातील काही भागांमध्ये विजेचा प्रश्न सुटलेला नाही.शेतीला वीज उपलब्ध होत नसल्याने खूप विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहेत.परंतु वीज नसल्याने सिंचन सुविधा देखील असून नसल्यासारख्या आहेत.ऐन पीक वाढीच्या काळात वीज उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना पिकाचे उत्पन्न काढण्याचे मुश्किल होऊन बसले आहे.त्यामुळे अलिकडील काही काळामध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
यावर उपाय म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून त्या दिशेने पाऊल टाकले आहे.सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे.
हे पण वाचा:- नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात!
केंद्र सरकारच्या माध्यमातून सबंध देशभर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे.महाराष्ट्रात महा कृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे.अलीकडेच राज्यात कुसुम-ब योजना अर्थातच कुसुम योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे.पात्र तसेच इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून कृषी सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.जात प्रवर्गानुसार ९० ते ९५ टक्के अनुदान या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दिले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम स्वःहिस्सा म्हणून भरावी लागणार आहे.
किती क्षमतेचे सौर कृषी पंप मिळतात?
प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ एचपी,५ एचपी आणि ७ एचपी कृषी सोलर पंपांचे वाटप करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून महा ऊर्जास १ लाख ४ हजार ८२३ सौर कृषी पंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे.त्यामुळे जिल्हानिहाय लोकसंख्येनुसार उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महा ऊर्जाकडून राज्यात आतापर्यंत ७७ हजार ७७८ सौर कृषी पंपांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाऊर्जा कडून योजनेचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.
अनुदान किती मिळते?
सदर योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान दिले जाते.त्यामुळे उर्वरित ५ टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी सौर पंप खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते.तसेच उर्वरित १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागते.
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक तसेच पात्र शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.यासाठी शेतकऱ्यांना या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.राज्यात नुकताच पीएम कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.