Gram Panchayat Election
Gram Panchayat Election
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे.राज्यात दिवाळीपूर्वी ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्राम पंचायतींची निवडणूक येत्या ५ नोव्हेंबरला होणार आहे.याच दिवशी दोन हजार ९५० ग्राम पंचायत सदस्यांसाठीची आणि १३० सरपंच निवडण्यासाठी पोटनिवडनुक होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले आहे.या सर्व ग्राम पंचायत क्षेत्रामध्ये आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.निवडणुकीमुळे गावातील वातावरण तापणार आहे.
हे पण नक्की वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ४७२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे
उमेदवारी अर्ज भरणे :- १६ ते २० ऑक्टोबर
उमेदवारी अर्जांची छाननी :- २३ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख:-
२५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत
निवडणूक चिन्ह वाटप:- २५ ऑक्टोबर
Gram Panchayat Election Date मतदानाची तारीख:-
५ नोव्हेंबर सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत.
गोंदिया आणि गडचिरोली नक्षलग्रस्त भागात मतदान सकाळी ७:३० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत होईल.
Gram Panchayat Election Result Date मतमोजणी व निकालाची तारीख :-
६ नोव्हेंबर. गोंदिया आणि गडचिरोली नक्षलग्रस्त भागात मतमोजणी ७ नोव्हेंबर रोजी होईल.
कोणकोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींची निवडणूक होणार?
ठाणे- ६१ | बीड- १८६ |
पालघर- ५१ | नांदेड- २५ |
रायगड- २१० | धाराशिव- ६ |
रत्नागिरी- १४ | परभणी- ४ |
सिंधुदुर्ग- २४ | जालना- ४ |
नाशिक- ४८ | लातूर- १३ |
धुळे- ३१ | अमरावती- २० |
जळगाव- १६८ | अकोला- १४ |
अहमदनगर- १९४ | यवतमाळ- ३७ |
नंदुरबार- १६ | बुलढाणा- ४८ |
पुणे- २३१ | वाशिम- २ |
सोलापूर- १०९ | नागपूर- ३६५ |
सातारा- १३३ | वर्धा- २९ |
कोल्हापूर- ८९ | चंद्रपूर- ८ |
सांगली- ९४ | भंडारा- ६६ |
छत्रपती संभाजीनगर- १६ | गोंदिया- ४ |
गडचिरोली- ३९ |
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.