How to Download Ration Card
How to Download Ration Card
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टल वर आपले स्वागत आहे.सरकारने स्वस्त धान्य दुकानांतील होणारा काळा बाजार रोखण्यासाठी सर्व दुकाने ही ऑनलाईन प्रणालीद्वारे सरकारशी जोडली गेली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाईन केले गेले आहे.आधार कार्ड सारखा 12 अंकी युनिक नंबर प्रत्येक रेशन कार्ड साठी देण्यात आला आहे.हेच ऑनलाईन झालेले रेशन कार्ड आपण आपल्या मोबाईलवरून डाऊनलोड करू शकणार आहात.
त्यासाठी आम्ही तुम्हाला ते कसे डाऊनलोड करायचे आहे हे आजच्या लेखामधून सांगणार आहेत.How to Download Ration Card
रेशन कार्ड डाऊनलोड कसे करायचे?
1)सर्व प्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.
2)वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक Captcha Code दिसेल तो तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे.
3) Captcha Code टाकून झाल्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाच्या व्हेरीफाय (Verify) बटणावर क्लिक करायचे आहे.How to Download Ration Card
4)तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल.तिथे तुम्हाला तुमचा बारा अंकी रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
5)त्यानंतर व्ह्यू रिपोर्ट (View Report) या बटणावर क्लिक करायचे आहे.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांना होणार 4 शेळी व 1 बोकड आणि मिल्किंग मशीनचे वाटप
6)आता तुमच्या समोर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड दिसणार आहे.
7)तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी प्रिंट युवर रेशन कार्ड (Print your ration card) या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
8)तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकणार आहेत.
रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.