Krushi Sevak Bharti 2023
Krushi Sevak Bharti 2023
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.महाराष्ट्र राज्य कृषी विभागात रिक्त कृषी सेवक पदांची सरळसेवेने भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध कृषी विभागामध्ये रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.या साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, तसेच इतर आवश्यक अर्हता पुढील प्रमाणे असणार आहेत.तसेच अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात PDF वाचावी.
Krushi Sevak Bharti 2023
संस्थेचे नाव – कृषी विभाग महाराष्ट्र राज्य.
एकूण रिक्त पदांची संख्या- 2109 पदे
रिक्त पदांचा तपशील –
विभागाचे नाव | एकुण रिक्त पदे |
1)अमरावती कृषी विभाग – 227 | 227 पदे |
2) छ.संभाजीनगर कृषी विभाग 196 | 196 पदे |
3)कोल्हापूर कृषी विभाग 250 | 250 पदे |
4)लातूर कृषी विभाग 170 | 170 पदे |
5)नागपूर कृषी विभाग 448 | 448 पदे |
6)नाशिक कृषी विभाग 336 | 336 पदे |
7)पुणे कृषी विभाग 188 | 188 पदे |
8)ठाणे कृषी विभाग 294 | 294 पदे |
नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण कृषी विभाग
पदभरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शासन मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठातुन कृषी डिप्लोमा/कृषी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
i) खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 19 ते 38 वर्ष
ii)मागास वर्गीय उमेदवार – 19 ते 43 वर्ष
iii) अंशकालीन उमेदवार – 19 ते 55 वर्ष
iv) प्रावीण्य प्राप्त खेळाडू उमेदवार – 19 ते 43 वर्ष
v) दिव्यांग उमेदवार – 19 ते 45 वर्ष
vi) भूकंप/प्रकल्प ग्रस्त उमेदवार – 19 ते 45 वर्ष
vii) माजी सैनिक उमेदवार – सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका अधिक 3 वर्ष
viii) अनाथ उमेदवार – 19 ते 43 वर्ष
घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
1)सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.परीक्षा निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
2)संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
3)संगणक आधारित परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासक्रम व इतर तपशील खालीप्रमाणे.
अ.क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1. | मराठी | 20 | 20 |
2. | इंग्रजी | 20 | 20 |
3. | सामान्य ज्ञान | 20 | 20 |
4. | बौद्धिक चाचणी | 20 | 20 |
5. | कृषी विषय | 60 | 120 |
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग (अराखिव) -. ₹1000/-
राखीव प्रवर्ग – ₹900/-
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
1)परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येईल.परीक्षेचे केंद्र/स्थळ/दिनांक/वेळ बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.
2)परीक्षा प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली जाणार नाही.परीक्षेचा कालावधी जरी 120 मिनिटांचा असेल तरी सुद्धा उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील विहित प्रक्रिया (उमेदवारांना महत्वाच्या सूचना देणे.उमेदवारांची कागदपत्राची पडताळणी करणे,आवश्यक कागदपत्रे जमा करणे,लॉग इन करणे)पार पाडण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान १ तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे.
3)उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती कोणत्याही टप्प्यावर चुकीची,अपूर्ण अथवा खोटी आढळून आल्यास उमेदवाराची संबंधित पदासाठीची उमेदवारी रद्द करण्यात येईल व संबंधित उमेदवारास कायदेशीर कारवाईस पात्र राहील.चुकीच्या माहितीच्या आधारे नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्व सूचना/नोटीस अथवा कारण न देता उमेदवारा तात्काळ सेवेतून काढून टाकण्यास पात्र राहील.त्यामुळे होणाऱ्या या सर्व परिणामास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
4)ओळख पटविणे – परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्रासह उमेदवाराचे ओळख पटविनारे उमेदवाराचे अलीकडील फोटो चीटकवलिले वैध फोटो ओळखपत्र जसे पॅन कार्ड/पारपत्र/वाहनचालक परवाना/मतदार ओळखपत्र/फोटो सहित आधारकार्ड/बँकेचे फोटो सहितचे पासबुक/महाविद्यालयाचे/विद्यापीठाचे अलीकडील वैध ओळखपत्र/कर्मचारी ओळखपत्र/फोटो सहित असणारे बार कौन्सिलचे ओळखपत्र समवेक्षक/पर्यवेक्षकाला सादर करणे आवश्यक आहे.उमेदवाराची ओळख ही उमेदवाराचे प्रवेशपत्र हजेरीपत्रक/उपस्थितीपत्रक त्याने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे पटविली जाईल.जर उमेदवाराची ओळख पटविण्याबाबत काही शंका उपस्थित झाल्यास किंवा ओळख संशयास्पद असल्यास त्याला परीक्षेसाठी उपस्थित राहू दिले जाणार नाही.
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
लवकरच कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
लवकरच कळविण्यात येईल.
मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.