Land Gift Deed
Land Gift Deed
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखामधून शेतीचे बक्षिसपत्र म्हणजे काय? आणि ते कसे केले जाते याची सखोल माहिती जाणून घेणार आहोत.
शेती म्हणले की शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय. कधी कधी या शेतीसाठी भावा भावा मध्ये, चुलता पुतण्यामध्ये झालेली भांडणे आपण नक्कीच ऐकली असतील. शेतकऱ्यांना शेतीच्या कायद्यांच्या बाबतीत असलेल्या चुकीच्या माहिती मुळे असे प्रसंग घडतात.
आज अशाच एका नवीन विषयाची माहिती आम्ही आपणास देणार आहोत.जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये असलेल्या चुकीची माहिती वाद वाढविणार नाही.चला तर मग जाणून घेऊ या बक्षीस पत्रा बाबतची माहिती.
काय आहे बक्षिसपत्र?
Land Gift Deed
आपल्या रक्ताच्या नात्यातील ज्या व्यक्तीला आपली शेतजमीन तसेच इतर स्थावर मालमत्ता यांची मालकी अथवा कायदेशीर हक्क मिळावा त्याकरिता कायदेशीर रित्या मुद्रांक शुल्क भरून एक दस्तऐवज तयार केला जातो.त्यालाच बक्षिसपत्र म्हटले जाते.
हे पण नक्की वाचा:- आपल्या शेतजमिनीचा नकाशा पहा,आपल्याच मोबाईलवरून
याकरिता भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रकमेत मालमत्तेची किंमत आणि ठिकाणानुसार बदल होत असतो. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर भेट पत्राची नोंदणी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक आहे.त्यामुळे नोंदणी दस्ताला कायदेशीर मान्यता प्राप्त होते.
कशासाठी करायचे असते?
आपल्या रक्ताच्या नात्यातील मालमत्तेचे व्यवहार करताना भविष्यात काही वाद निर्माण होऊ शकतात.हे वाद टाळण्यासाठी बक्षीस पत्र करणे गरजेचे आहे.त्याकरिता कायदेशीर प्रक्रिया केली जाते.Land Gift Deed
मुद्रांक शुल्क किती भरावे लागते?
बक्षीस पत्र करतेवेळी भरावे लागणारे मुद्रांक शुल्क हे मालमत्ता आणि ठिकाण यांवरून वेगवेगळे असू शकते. शासकीय नियमानुसार मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या 3% रक्कम आकारली जाते. मुलगा,मुलगी,पत्नी किंवा नातवंडे अशा रक्तातील नातलागांसाठी मुद्रांक शुल्कात सूट मिळते.
रजिस्ट्री करताना काय काळजी घ्यायला पाहिजे?
मलामत्ता बक्षीस पत्र करताना त्याची रजिस्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात करावी.बक्षिसपत्र करताना ज्याचे नावे तुम्ही करणार आहात त्या व्यक्तीला भविष्यात ती मिळकत तुमच्या पूर्व संमतीशिवाय विकता येणार नाही असे नमूद करावे. म्हणजे पश्र्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
सदरचे बक्षिसपत्र कायदेशीर रित्या तेव्हाच ग्राह्य धरले जाते जेव्हा दोन चांगल्या वर्तणुकीतील साक्षीदारांच्या सह्या त्यावर घेतल्या जातात.
हे पण वाचा:- जमीन खरेदी विक्री करताय तर हे नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत
बक्षीसपत्र करतेवेळी जो बक्षिसपत्र लिहून देणार आहे आणि जो लिहून घेणार आहे.अशा दोघांना देखील दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
बक्षीसपत्र रद्द होऊ शकते का?
देणारा आणि घेणारा यावर एकमत होत असतील. बक्षिसपत्र जर बळजबरीने/फसवून केले गेले आहे.असे सिद्ध करता आले तर पण या साठी असे झाल्यापासून ३ वर्षात दाद मागावी लागते.Land Gift Deed
इतर कोणत्याही कारणामुळे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही.
एकदा का देणाऱ्याने आपल्या उक्तीतून किंवा कृतीतून बक्षीस हे मंजूर आहे असे दर्शविले की ते रद्द होत नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.