Land Record Maharashtra
शेतकरी वर्गाला शेतजमीन खरेदी करताना त्या शेतजमिनी विषयी पूर्व इतिहास माहीत असणे गरजेचे असते.त्यासाठी शेतकऱ्यांना फेरफार उतारे,सात बारा,खाते उतारे या विषयी माहिती असणे गरजेचे आहे.
राज्य सरकारने शेतजमिनीचे 1880 सालापासूनाचे जुने फेरफार उतारे शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.राज्यात सुरुवातीला ही योजना ७ जिल्ह्या पुरती प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती.परंतु आत्ता सरकारने ही योजना राज्यातील १९ जिल्ह्या साठी सुरू केली आहे.
ते १९ जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत.लातूर, मुंबई उपनगर,नंदूरबार,नाशिक,अहमदनगर, अकोला,अमरावती, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग,ठाणे,वाशिम,यवतमाळ,औरंगाबाद, चंद्रपूर,धुळे,गडचिरोली,गोंदिया,जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
वरील जिल्ह्यांमधील जुने फेरफार उतारे ई- अभिलेख च्या माध्यमातून जवळपास ३० कोटी जुने फेरफार उतारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.हे फेरफार उतारे आपण आपल्या मोबाईल वरून कसे पाहायचे याचीच माहिती घेणार आहोत.
Land Record Maharashtra
जुने फेरफार उतारे कशे पाहायचे?
•जुने फेरफार उतारे पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या मोबाईल मधील इंटरनेट ब्राऊझर मध्ये जाऊन https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in ही वेबसाईट सर्च करावी लागेल.
•त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
•वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला e- records ( Archieved Documents) या नावाचे नवीन पेज दिसेल.या पेज वर जाऊन तुम्हाला उजवीकडील बाजूला भाषा हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.
•सदर वेबसाईट ला जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तेथील सेवांचा लाभ घेऊ शकता.
•परंतु तुम्ही जर या वेबसाईटला नवीन वापरकर्ता असाल तर तुम्हाला अगोदर नोंदणी करून घ्यावी लागेल.त्यासाठी तुम्हाला नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•वरील पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मधील सर्व माहिती आपल्याला भरायची आहे.जसे की नाव,जन्मतारीख,पत्ता, राष्ट्रीयत्व,लिंग,आपला व्यवसाय आदी माहिती आपल्याला भरायची आहे.
•ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी तयार करायचा आहे.लॉग इन आयडी तयार झाल्यानंतर तुमचा पासवर्ड देखील तुम्हीच तयार करायचा आहे.
•वरील सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या समोर वापरकर्ता नोंदणी यशस्वी झाली असा मेसेज दिसेल.
•त्यानंतर तुम्हाला लॉग इन च्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तयार केलेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
•आत्ता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला फेरफार उतारा काढण्यासाठी सुरुवातीला तुमचा जिल्हा निवडायचा,नंतर तालुका आणि गाव निवडायचे आहे.
•तसेच तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा जसे की ७/१२ उतारा,८अ उतारा,किंवा फेरफार उतारा यावरती क्लिक करायचे आहे.
•नंतर तुम्हाला ज्या गटाचा उतारा हवा असेल तो गट नंबर तिथे टाकावा लागेल.
•जुने फेरफार उतारे पाहण्यासाठी तुम्ही गट नंबर टाकल्यानंतर तुमच्या समोर त्या गटातील फेरफार संबंधित माहिती दिसेल.तुम्हाला ज्या वर्षातील फेरफारनोंद पहायची आहे त्या क्रमांकांवर क्लिक करायचे आहे.
•फेरफार उतारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुनरावलोकन या कार्ट वर क्लिक करायचे आहे.या कार्ट ला ओपन केल्यानंतर डाउनलोड सारांश नावाचं पेज दिसेल त्याला क्लिक केल्यावर तुमच्या फेरफारची सद्यस्थिती उपलब्ध आहे असे दिसेल.त्या समोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर १९८२ च फेरफार पत्रक तुमच्या समोर ओपन होईल.
•या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर क्लिक केलं की तुमचा फेरफार डाउनलोड होईल.
•जुना सात बारा उतारा काढण्यासाठी देखील तुम्ही हीच प्रोसेस करू शकता.फक्त अभिलेख निवडताना तुम्हाला सात बारा असा निवडावा लागेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाइट पोर्टलला भेट देत रहा.