Lek Ladki Yojana:- लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणार 1 लाख रुपये,अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!

Spread the love

Lek Ladki Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने मुलीचा जन्मदर वाढविणे,मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली होती.परंतु सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन.सदर योजना अधिक्रमित करुन मुलीच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

काय आहे योजना?
Lek Ladki Yojana
2023

Lek Ladki Yojana

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये “मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.अशी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल,२०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना(Lek Ladki Yojana 2023) सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

१.मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे.
२.मुलींच्या शिक्षणासाठी चालना देणे.
३.मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
४.कुपोषण कमी करणे.
५.शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

हे पण वाचा:- १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना,महिन्याला मिळणार ५००० रुपये!

योजनेच्या अंतर्गत किती लाभ मिळतो?

लेक लाडकी योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये,इयत्ता पहिलीत असताना ६ हजार रुपये,मुलगी सहावीत असताना ७ हजार रुपये,अकरावीत असताना ८ हजार रुपये तसेच लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये एवढी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

१.लेक लाडकी योजना ही राज्यातील पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक यांचासाठीच लागू असणार आहे.
२.कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच,एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.Lek Ladki Yojana
३.पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
४.दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे.


५)दिनांक १ एप्रिल,२०२३ पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा असल्यास व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू असणार आहे.मात्र माता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
६)लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक असणार आहे.
७)लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
८)लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे Lek Ladki Yojana 2023

Lek Ladki Yojana

१)लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला
२)कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.)याबाबत तहसिलदार/सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
३)लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
४)पालकाचे आधार कार्ड
५)बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
६)रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरीवारी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
७)मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
८)सबंधित टप्प्यावरील लाभांकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
९)कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
१०)अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील,अविवाहीत असल्याबाबत लाभार्थी मुलीचे स्वयं घोषणापत्र.

अर्ज कुठे करायचा?Lek Ladki Yojana Apply Online

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,विभागीय उपायुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहे.ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून सदरचा अर्ज आपल्या गावातील अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह जमा करायचा आहे.

लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment