आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळणार तुमच्या मोबाईलवरून,वेळेची आणि पैशांची होणार बचत! Maha E Gram App

Spread the love

Maha E Gram App
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल डिजिटल युगाच्या काळात अनेक शासकीय सेवा ऑनलाईन पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना पुरविल्या जात आहेत.यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.तसेच वेळेची आणि पैशांची देखील बचत होते.

महा ई ग्राम मोबाईल ॲप्लिकेशन

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत मधील दाखले ऑनलाईन पद्धतीने मिळावेत यासाठी “महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट ऍप” ( Maha E Gram App) हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना आपली ग्रामपंचायत मधील दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत.

कोणते दाखले मिळणार?

या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना जन्म नोंदीचा दाखला,मृत्यू नोंदीचा दाखला,विवाह नोंदीचा दाखला,दारिद्य्र रेषेखालील दाखला आणि असेसमेंट उतारा (गाव नमुना नं.८) हे दाखले ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत.तसेच नागरिक आपले ग्रामपंचायत कर जसे की घरपट्टी,पाणीपट्टी याच मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून भरू शकणार आहेत.

महा ई ग्राम मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केल्यामुळे नागरिकांची वेळेची तसेच पैशाची देखील बचत होणार आहे.त्यामुळे दाखले मिळवण्यासाठी आता ग्रामपंचायतचे उंबरे झिजवण्याची गरज पडणार नाही.

हे पण वाचा:- आता घरबसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा,जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया!

महा ई ग्राम ॲप्लिकेशन कसे डाऊनलोड करायचे?

१. महा ई ग्राम मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Google Play Store वर जावे लागेल.
२.तिथे सर्च बॉक्समध्ये “Maha e gram citizen connect” असे टाईप करून सर्च करायचे आहे.
३.आपल्याला Maha E Gram Citizen Connect हा पर्याय निवडायचा आहे.
४.पुढे डाऊनलोड या बटणावर क्लिक करायचे आहे.
५.ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर इंस्टॉल करून घायचे आहे.
६.ॲप्लिकेशन इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करायचे आहे.

महा ई ग्राम ॲप्लिकेशन कसे वापरायचे?
Maha E Gram

१.आपल्या मोबाईल मधील महा ई ग्राम ॲप्लिकेशन ओपन करून घ्यावे.
२.ओपन झाल्यानंतर Register या बटणावर क्लिक करायचे आहे.
३.आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल तिथे आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे.
४.माहिती भरताना आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.आणि ‘पुढे’ या बटणावर क्लिक करायचे आहे.
५.आता आपल्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा टाकून “समाप्त” या बटणावर क्लिक करायचे आहे.
६.आता आपल्या मोबाईलवर आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मेसेज केला जाईल तो टाकून आपल्याला लॉग इन करायचे आहे.
७.लॉग ऑन केल्यानंतर आपण आपला जिल्हा,तालुका आणि आपली ग्रामपंचायत निवडायची आहे.

लॉग इन केल्यानंतर खालील पर्याय दिसतील

•दाखले/प्रमाणपत्र
•कर भरणा
•व्यवहार इतिहास
•ग्रा.पं. पदाधिकारी
•आपले सरकार सुविधा
•सूचना पेटी
•विवाह नोंदणी अर्ज

या वरील पर्यायांपैकी आपल्याला जी सेवा आवश्यक आहे त्या सेवेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहेत.महा ई ग्राम मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना ग्रामपंचायत मधील सर्व दाखले आपल्या मोबाईलवरून घरबसल्या मिळवणे शक्य होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment