Maharashtra Rain Update:- शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! पावसाचा मूड बदलला,हवामान विभागाचा नवीन अंदाज!

Spread the love

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टल वर आपले स्वागत आहे.आज आपण राज्यातील हवामान विभागाचा पावसा संदर्भातील नवीन अंदाज जाणून घेणार आहोत.राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली आहे.सर्वांसाठी तो चिंतेचा विषय बनला आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल की काय अशी भीती सर्वांना होती.पाऊस जर पडलाच नाही तर पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा आणायचा कुठून? अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.परंतु पावसाने सध्या तरी दिलासा दिला आहे. Maharashtra Rain Update

मागील आठवड्यापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.मुंबई,ठाणे, रायगड, पालघर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नागपूर,पुणे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगलाच पाऊस पडत आहे.राज्यातील शेतकरी चातक पक्षासारखी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे.

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पाऊस देखील पडत आहे.आता तो कुठे कुठे पडणार आणि किती दिवस सक्रिय असणार याबाबतचा अंदाज पुणे हवामान विभागाने दिला आहे.पुणे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात पुढील 48 तास मान्सून सक्रिय असणार आहे.

राज्यातील भंडारा, गोंदिया,नागपूर आणि रायगडमधील ठराविक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.तसेच उर्वरित महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.तसेच 25 आणि 26 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह राज्यात पाऊस बरसणार आहे.

राज्यात आता कुठे कुठे पडला पाऊस?


Maharashtra Rain Update

पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग

काल गौरी पूजनाच्या मुहूर्तावर पुणे शहर तसेच उपनगरांमध्ये पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. दुपारी तीनच्या नंतर पावसाला सुरुवात झाली.शहरातील हडपसर, धायरी,कात्रज,स्वारगेट मधील भागांमध्ये पावसाने चांगलेच झोडपले आहे.पावसामुळे शहरात चांगलीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले होते.पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.तसेच हवामान विभागामार्फत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस

मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.शेतातील पिके पावसाअभावी करपून चालली होती.उकाड्याने तर नागरिक प्रचंड त्रस्त होते.परंतु काल दुपारनंतर आणि रात्री झालेल्या पावसामुळे सर्वानाच चांगला दिलासा दिला आहे.त्यामुळे उकाडा काही प्रमाणात कमी होईल.कोपरगाव तसेच राहता तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. Maharashtra Rain Update

भंडारा जिल्ह्यात तुफानी पाऊस

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात तर ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.ढगफुटी सारखा पाऊस आल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.शहरातील 34 वर्ष जुन्या बावडी मंदिरातील शिवपिंड पाण्याखाली गेली आहे.

राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. बुलढाणा जवळीक येळगाव धरणामध्ये 70% पाणीसाठा झाला आहे.जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने तालुक्यातील कंकराज येथील धरण 100 टक्के भरले आहे. बीड जिल्ह्यात देखील सांगवी पाटण परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग खुश आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment