Maharashtra Sand Rate| राज्य सरकारचा मोठा निर्णय,’या’ नागरिकांना मिळणार मोफत वाळू,ऑनलाईन बुकींग सुरू,आजच अर्ज करा!

Spread the love

Maharashtra Sand Rate
नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.दिवसेंदिवस देशात महागाई वाढत चालली आहे त्याचाच परिणाम म्हणून बांधकाम क्षेत्रातील देखील वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत.

सिमेंट,वाळू,रेती आणि बांधकामासाठी लागणारे स्टील यांचे वाढते बाजारभाव सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.अशाच परिस्थिती मध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे.

शिंदे सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा आहे.नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील नागरिकांना वाळू ही ६०० रुपये ब्रास प्रमाणे दिली जाणार आहे.

आत्ता पर्यंत तुमच्या भागात ८ हजार ते १० हजार रुपये ब्रास विकली जाणारी वाळू आता अतिशय माफक दरात शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.६०० रुपये प्रति ब्रास वाळू कशा पद्धतीने मिळणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत नवीन रेती धोरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.सदर निर्णयानुसार राज्यात आता रेती ६०० रुपये ब्रास प्रमाणे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे राज्यातील घरकुल लाभ धारक असणाऱ्या नागरिकांसाठी शासनाच्या वतीने पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे.इच्छुक लाभार्थ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

शासनाच्या खनिज व उत्खनन विभागाच्या माध्यमातून यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे.या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना वाळू साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

वाळूसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment