Maharashtra Winter Session
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकरी तसेच सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४८ हजार ३८४ कोटी ६६ लाख रुपयांचा भार पडणार आहे.
यापैकी १९ हजार २४४ कोटी ३४ लाख रुपयांच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत.तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी राज्य सरकारच्या हिस्स्यापोटी ३ हजार ४८३ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.यामुळे राज्यात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सर्वसामान्य घटकांपर्यंत विकासाची संधी पोहचवण्यासाठी होणार आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी किती तरतूद?
Maharashtra Winter Session
महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागासाठी देखील निधीची तरतूद करण्यात येते.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर राज्य सरकारच्या वतीने या हिवाळी अधिवेशनामध्ये कृषी क्षेत्रासाठी ५ हजार ५६३ कोटी ७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.आतापर्यंत एका हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी २ हजार १७५ कोटी २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने दुसऱ्या हप्त्याचे वितरण नवीन वर्षाच्या मुहूर्तावर केले जाऊ शकते.
हे पण वाचा:- अखेर ९ जिल्ह्यांतील घरकुलांची यादी जाहीर,यादीत आपले नाव चेक करा!
पीक विम्यासाठी केलेली तरतूद
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील तसेच रब्बी हंगामातील पिकांचा विमा १ रुपयात काढण्यासाठी योजना राबविली होती.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांचा विमा काढण्यासाठी एक रुपया प्रीमियम रक्कम भरावी लागणार होती.तसेच उर्वरित प्रीमियम रक्कम ही राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला देण्यात येणार आहे.त्यासाठी चालू हिवाळी अधिवेशनात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी २ हजार ७६८ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालू हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्ज पुरवठ्यासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.शेतकऱ्यांना बिगर व्याजी पीक कर्ज योजना अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.तसेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदानाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी ३०१ कोटी ६७ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने चालू हिवाळी अधिवेशनात कृषी क्षेत्रासाठी एकूण ५ हजार ५६३ कोटी ७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच या मंजूर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमधील निधीचा लाभ मिळणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.