Marriage Certificate Maharashtra:- लग्न झालंय पण मॅरेज सर्टिफिकेट बनवलं नाही,भविष्यात येणार अडचण,अशी करा ऑनलाईन नोंदणी!

Spread the love

Marriage Certificate Maharashtra

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात आजकाल बऱ्याच योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज पडत असते.त्यापैकीच विवाह नोंदणी दाखला देखील तितकाच महत्वाचा आहे.आज समाजात अशी अनेक लोकं आहेत ज्यांची लग्न तर झाली आहेत परंतु त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नाही.लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून घेणे गरजेचे आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे कायदेशीर दस्तऐवज आहे.जो पर्यंत आपल्या कडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेल तो पर्यंत आपला विवाह कायदेशीररित्या वैध मनाला जात नाही.विवाह नोंदणी प्रमाणपत्र मधून दोन्ही बाजूंच्या पक्षांची नावे,विवाहाची तारीख,वेळ आणि ठिकाण समजते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे फायदे

विवाह नोंदणी प्रमाणपत्र विधवा महिलांना वारसा हक्क सांगण्याची परवानगी देते.या प्रमाणपत्राच्या माध्यमातून द्वीपत्नित्व किंवा बहुपत्नित्व तपासण्यासाठी देखील मदत होते.हे प्रमाणपत्र पत्नींना सोडुन देणाऱ्या पतींसाठी प्रतिबंधक म्हणून काम करते.तसेच या प्रमाणपत्राच्या आधारे स्त्रियांना पतीकडून आश्रय घेण्यासाठी तसेच मुलांचा ताबा घेण्यासाठी मदत करते.त्याचबरोबर विमा पॉलिसी साठी दावा करण्यासाठी आणि बँकेतील वारस नोंदीसाठी विवाह प्रमाणपत्र हे महत्वाचे दस्तऐवज आहे.

ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र Online Marriage Certificate Maharashtra

भारतातील बऱ्याच राज्यांनी आपल्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने विवाह नोंदणी दाखला उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे.अद्याप काही राज्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया अजूनही पारंपारिक पद्धतीनेच केली जाते.तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र साठी नोंदणी करायची असल्यास तुम्हाला तुमच्या राज्याच्या विवाह नोंदणी पोर्टलला भेट द्यावी लागेल.आपल्या महाराष्ट्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पती आणि पत्नीचे आधार कार्ड
  • पती पत्नीचे पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • लग्न पत्रिका
  • लग्नातील फोटो
  • दोन साक्षीदार
  • साक्षीदारांचे आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार १५०० रुपये!

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्र राज्यात विवाह नोंदणी प्रमाणपत्र(Marriage Certificate Maharashtra) काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपले सरकारच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध असणार आहे.तसेच नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सदरची प्रक्रिया उपलब्ध असणार आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार या महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.त्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • तुम्हाला स्वतःचे नवीन खाते लॉगिन करून तयार करावे लागेल.
  • आता लॉगिन केल्यानंतर Marriage Certificate या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल तिथे तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे.
  • आधार कार्ड,पॅन कार्ड साक्षीदारांचे आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र साठी आवश्यक शुल्क आपल्याला भरावे लागणार आहे.
  • तुम्ही दाखल केलेल्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर आपले ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट काही दिवसांत ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केले जाईल.
  • अपलोड केलेले मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला डाऊनलोड करायचे आहे.
  • तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने काढू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment