MSRTC Big News :- आता या लोकांचा एसटीचा मोफत प्रवास बंद,शासनाचा नवीन निर्णय जाहीर!

Spread the love

MSRTC Big News

महाराष्ट्र राज्य शासन नेहमीच राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते.अशीच योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यातील नागरिकांसाठी राबविली आहे.राज्यातील नागरिकांना सवलतीच्या तसेच माफक दरामध्ये एसटीचा प्रवास करता यावा म्हणून ही योजना राबविली जात आहे.

काय आहे योजना?

राज्य सरकारने घेतलेल्या नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील 75 वर्षांवरील वय असलेल्या नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली. त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा चांगला फायदा झाला आहे.त्याचबरोबर राज्यातील महिलांना तिकीटामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे.

कोणाला मिळणार सवलत?
MSRTC Big News



या योजने अंतर्गत राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला सवलत देण्यात आली आहे. सदर योजनेमुळे
एसटी महामंडळालाच्या
महसुलात वाढ झाली आहे.या योजने अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांना निमआराम आणि आराम बस मधून प्रवास करण्यासाठी सवलत असेल.

कोणाची सवलत झाली बंद?

एसटी महमंडळ राज्यातील विविध 29 समाज घटकांना प्रवासासाठी सवलत देत असते.त्याचा अतिरिक्त भर महामंडळाच्या तिजोरीवर पडतो.राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन याची भरपाई करत असते.

आजारी व्यक्तींना मोफत प्रवास बंद
MSRTC Big News


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 2018 सालच्या परिपत्रकानुसार एसटी बस मधून सिकलसेल, एचआयव्ही बाधित रुग्ण, डायलेसिस व हिमोफेलिया ग्रस्त रुग्णांसाठी मोफत एसटी प्रवास सवलत देण्यात आली होती.

हे पण वाचा :- तुमच्या ग्राम पंचायतची मतदान यादी जाहीर,चेक करा यादीत आपले नाव आहे की नाही ?

त्यामुळे सदर आजातग्रस्त संपूर्ण राज्यभर मोफत प्रवास करू शकत होते.परंतु आता सदर आजारग्रस्त रुग्णांना निमआराम आणि आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही.

परंतु सिकलसेल, एचआयव्ही बाधित रुग्ण, डायलेसिस व हिमोफेलिया ग्रस्त रुग्णांना एसटीच्या साध्या बस मधून मोफत प्रवास करता येणार आहे.

त्यामुळे या दुर्धर आजार ग्रस्त असलेल्या रुग्णांना एसटीच्या निमआराम हिरकणी, शिवशाही, शिवाई,शिवनेरी तसेच अश्वमेध या बस मधून मोफत प्रवास सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी दिले आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment