NAFED News
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान्य पणन महामंडळाकडून किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी केले जाते.या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. बाजारपेठेत व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाला कमी भावात खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असत.परंतु पणन केंद्र सरकारने पिकाच्या किमान आधारभूत किमती ठरवून दिल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याचे दिसत आहे.
Table of Contents
कधीपर्यंत मुदत होती?
NAFED News
खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि. ३० नोव्हेंबर,अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती.तथापि, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार,मागील हंगामांचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झालेली नसल्याचे दिसते,शासनाने म्हटले आहे.
कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली?
सदर बाबीचा विचार करता,पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि. ३१ डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
हे पण वाचा:- राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार इतके रुपये अनुदान,मुख्यमंत्र्यांची घोषणा!
तसेच,हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी याकरिता आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता मुदतवाढ दिल्याचे सर्व शेतकऱ्यांना कळावे असे शासनाचे अवर सचिव मिलिंद शेणॉय यांनी म्हटले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.