New Voter Card Registration Maharashtra
New Voter Card Registration Maharashtra
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. येथील केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी चालवत असतात.
भारताच्या राज्यघटनेने सुरुवातीला 21 वर्ष वयाच्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला होता.कालांतराने यामध्ये बदल करून तो 18 वर्ष करण्यात आला.
देशातील प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी किमान 18 वर्ष वय पूर्ण असावे लागते. परंतु आत्ताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी यामध्ये थोडासा बदल केला आहे.
Table of Contents
ज्या नागरिकांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण होणार आहे त्यांना वयाच्या 17 व्या वर्षीच मतदान नोंदणी करता अर्ज करता येणार आहे.
हे पण नक्की वाचा:- आता घरबसल्या आधार कार्ड वरील नाव,जन्म तारीख,मोबाईल क्रमांक बदला.
New Voter Card Registration Maharashtra
निवडणूक आयोगाच्या नवीन नियमानुसार आता तरुणांना वर्षातून 3 वेळा आपले नाव मतदानासाठी नोंदवीता येणार आहे.1 जानेवारी,1जुलै आणि 1 ऑक्टोबर यादिवशी आपले नाव नवीन मतदान कार्डासाठी नोंद करता येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून यासाठी नवीन फॉर्म आणले जाणार आहेत.नागरिकांना आपल्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा आधार कार्ड द्यावे लागणार आहे.
नागरिकांनी आपले वयाच्या 17 व्या वर्षी मतदान कार्ड करिता नोंदणी केल्यानंतर त्यांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन मतदान कार्ड मिळणार आहे.
नवीन मतदान नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1)आधार कार्ड/जन्म दाखला
2)मोबाईल क्रमांक
3)पॅन कार्ड
4) ईमेल आयडी
अर्ज कुठे करायचा?
मित्रांनो आपल्याला नवीन मतदान कार्ड साठी नोंदणी करण्यासाठी आता कुठे ही जाण्याची गरज नाही आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन नवीन मतदान नोंदणी करू शकणार आहेत.त्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्हाला मोबाईल वरून शक्य नसल्यास तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील नोंदणी करू शकता.
किंवा तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या प्रभागातील BLO ऑफिसर (Booth Level Officer) कडे देखील नवीन मतदान नोंदणी करू शकणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.