Paytm Bank Banned :- आजकाल ऑनलाईन बँकिंग व्यवहार करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.फोन पे,गूगल पे तसेच पेटीएम सारख्या यूपीआय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट केले जाते.परंतु अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यामुळे या बँकेच्या युजर्स साठी ही एक खूप दुःखाची बातमी असणार आहे.
Table of Contents
Paytm Bank Banned
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेच्या कार्य प्रणालीवर मोठा निर्बंध घातला आहे.याचा ग्राहकांवर तसेच व्यवहारांवर कसा परिणाम होणार आहे तसेच कोणते नवीन बदल केले जाणार आहेत असे अनेक प्रश्न पेटीएम बँकेच्या ग्राहकांच्या मनात निर्माण झाले आहेत.रिझर्व्ह बँक Paytm बँकेच्या नियमांमध्ये काय बदल करणार आहे?
या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेवर कोणती कारवाई केली आहे.तसेच पेटीएम बँकेच्या नियमांमध्ये काय बदल केले जाणार आहेत याची सविस्तर माहिती देणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटापर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.
रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेवर काय कारवाई केली?
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार पेटीएम बँकेने नियमांचे उल्लंघन केलेले आहे.त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेवर कठोर कारवाई केली आहे.आरबीआयने सांगितल्या प्रमाणे पेटीएम बँकेने ऑडिट अहवालात आणि बाह्य लेखा परीक्षकांच्या अहवालामध्ये अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या कारवाईमुळे पेटीएम बँकेच्या ग्राहकांसाठी 29 फेब्रुवारी पासून खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.तसेच पेटी एम बँकेच्या इतर सेवांवर देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वतीने निर्बंध घालण्यात आले आहेत.
तसेच तुम्ही जर Paytm बँकेचे FASTag वापरत असाल आणि Paytm Postpaid चा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे या सेवांचा लाभ घेता येणार नाही.कारण RBI कडून या सुविधांवर बंदी घालण्यात आली आहे.तुम्ही तुमच्या Paytm FASTtag मधील शिल्लक रक्कम असे पर्यंत Fastag वापरू शकणार आहेत.परंतु पुन्हा पेटीएम मधून रिचार्ज करता येणार नाही.
Paytm मोबाईल ॲप्लिकेशन बंद होणार का?
Paytm Bank Banned
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेवर केलेल्या कारवाईमुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की पेटीएम मोबाईल ॲप्लिकेशन बंद होणार का?तर मित्रांनो RBI ने पेटी एम बँकेवर कारवाई केलेली आहे परंतु तुम्ही तुमचे पेटीएम मोबाईल ॲप्लिकेशन विना अडथळ्याशिवाय वापरू शकणार आहेत.
पूर्वीप्रमाणेच तुम्ही तुमचे पेटीएम मोबाईल ॲप्लिकेशन वापरून मोबाईल रिचार्ज,वीज बिल भरणा,पाणी बिल भरणा,पेटीएम गोल्ड,पेटीएम मनी यांसारख्या सुविधा वापरू शकणार आहेत.त्यासाठी तुम्हाला इतर बँकांचा जसे की एचडीएफसी किंवा ॲक्सिस इत्यादी.वापर करावा लागणार आहे.त्यामुळे तुम्ही पूर्वीसारखेच तुमचे पेटीएम मोबाईल ॲप्लिकेशन वापरू शकणार आहेत.कारवाईचा फटका फक्त पेटीएम बँकेत खाते असणाऱ्या व्यक्तींना बसणार आहे.
पेटीएम शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटी एम बँकेवर केलेल्या कारवाईचे पडसाद शेअर बाजारात पाहायला मिळाले.Paytm कंपनी One97 Communication Limited या नावाने शेअर मार्केटमध्ये काम करत आहे.RBI ने केलेल्या कारवाईमुळे पेटी एम च्या शेअर्स मध्ये 20 टक्के पर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
पेटी एम बँकेचे सी ई ओ विजय शर्मा यांनी मीडिया लागत बोलताना सांगितले की,29 फेब्रुवारी नंतरही पेटी एम बँकेचे ग्राहक बँकेच्या सेवा वापरू शकणार आहेत.यासाठी आम्ही इतर बँकांशी भागीदारी करणार आहोत,त्यामुळे बँकेच्या ग्राहकांनी कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.