Pik Vima Maharashtra 2023:- देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ यांसारख्या घटनांना नेहमी सामोरे जावे लागते.शेतकऱ्यांना या घटनांपासून दिलासा म्हणून केंद्र सरकारने देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली.या योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेल्यास मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. सदर रक्कम फक्त त्याच शेतकऱ्यांना दिली जाते जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सामील होतात.
Pik Vima maharashtra 2023
केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना लागू करण्यात आली आहे.चालू वर्षी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते.राज्य सरकारने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या वर्षी फक्त १ रुपयात ही योजना सबंध राज्यभर राबविण्यात आली.या योजनेत सहभागी होण्याकरिता शेवटची मुदत ही राज्य सरकार तर्फे वाढविण्यात आली होती.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी,गारपीट ,दुष्काळ, चक्रीवादळ तसेच नैसर्गिक किडींचा प्रादुर्भाव यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
अंतिम मुदतीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या वेबसाईट वर जाऊन आपले फॉर्म भरले आहेत तेच शेतकरी या योजनेकरीता पात्र असतील.
खरीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार
खरीप हंगामातील भात,ज्वारी बाजरी,नाचणी, मूग,उडीद , तूर,मका,भुईमूग, कारळे, तीळ,सोयाबीन,कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
महाराष्ट्र राज्यात या वर्षी मान्सून ने घेतलेला ब्रेक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकाची पेरणी तर केली आहे.परंतु पावसाअभावी शेतातील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत.अशातच “पीक विमा” शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.
पहा कोणत्या जिल्ह्यात पीक विमा झाला मंजूर
आपल्या राज्याचे कृषीमंत्री महोदय ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया फेसबुक अकाऊंट वरून पीक विम्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.बीड जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ही मोठी दिलासा देणारी बातमी असणार आहे.
बीड जिल्ह्यातील 87 महसुली मंडळामध्ये सोयाबीन,मूग, उडीद या तीन मुख्य पिकांचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.सोयाबीन,मूग, उडीद या तीन मुख्य पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याचा आत 25% अग्रिम पीक विमा रक्कम मिळणार असल्याचे कृषीमंत्री यांनी सांगितले.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.