दररोज पेपर वाचताय?मग तुम्हाला त्यावरील रंगीत ठिपक्यांचा अर्थ माहिती आहे का?नाही ना,मग जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

News:- आजकाल संपूर्ण जगात किंवा आपण राहत असलेल्या भागांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची प्रत्येकाची आवड आहे.त्यासाठी प्रत्येक नागरिक ऑनलाईन मोबाईलवर,टीव्हीवर किंवा वर्तमान पत्राच्या माध्यमातून या बातम्या पहात असतो किंवा वाचत असतो. बऱ्याच व्यक्तींच्या घरी नियमितपणे वर्तमानपत्र येत असते.

पण हे वर्तमानपत्र वाचताना तुम्ही कधी एक निरीक्षण केले आहे का?ज्या पानावर रंगीत जाहिराती किंवा बातम्या असतात त्या पानाच्या शेवटी खालच्या बाजूला विविध रंगांचे ठिपके छापलेले असतात.पण ते ठिपके कशामुळे छापले असतात आणि त्याचा काय अर्थ आहे याची माहिती तुम्हाला आहे का?आज या लेखाच्या माध्यमातून आपण वर्तमानपत्रातील त्याच रंगीत ठिपक्यांबद्दल जाणून घेणार आहेत.

अनेकांना पेपर वाचताना हे रंगीत ठिपके खालच्या बाजूस दिसतात.त्यामुळे प्रत्येकाला वाटते की पेपर सजविण्यासाठीच हे ठिपके दिलेले असतात परंतु हा तुमचा गैरसमज आहे.तिथे छापलेल्या प्रत्येक ठिपक्यांच्या वेगवेगळा अर्थ आहे.हे एक जुने तंत्रज्ञान आहे ज्यामुळे डिजिटल प्रिंटिंगच्या जगात एक क्रांतीच घडली आहे.त्यामुळे डिजिटल प्रिंटिंग खूप सोपे झाले आहे.हे तंत्रज्ञान CMYK नावाने ओळखली जाते.CMYK तंत्रज्ञान वापरून वर्तमानपत्र छापण्याचा खूप जुना ट्रेंड आहे.

हे पण वाचा:- आता उसने पैसे मागण्यासाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही,फोन पे आणि गूगल पे वरून मिळणार पैसे,व्याज पण लागणार नाही,किती पैसे मिळणार?वाचा संपूर्ण माहिती!

CMYK तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका दिवसात किती वर्तमानपत्रे छापली आहेत याची देखील माहिती मिळते. CMYK म्हणजे (Printing mark in correct sequence) योग्य सिक्वेन्स साठी हे रंगीत ठिपके वापरले जातात.एखाद्या वर्तमानपत्रात रंगीत ठिपक्यांची प्रिंट डबल झाली असेल तर ते वर्तमानपत्र ब्लर म्हणजे अंधुक दिसते. आज देखील अनेक वर्तमानपत्रांमध्ये हे CMYK तंत्रज्ञान वापरले जात आहे.

News

देशातील अनेक व्यक्तींना जगभरातील घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असते.त्यासाठी दररोज सकाळी वर्तमानपत्रातून या घडीमोडी जाणून घेतल्या जातात. प्रिंट मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती दैनिके,साप्ताहिके,मासिके यांच्या माध्यमातून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment