Samuhik Shettale Yojana
Samuhik Shettale Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर न्यूज पोर्टल वर आपले स्वागत आहे.आम्ही नेहमी आपल्याला वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचवत असतो.आज अशाच एका सरकारी योजनेची माहिती या लेखामधून जाणून घेणार आहोत.सदरची योजना ही शेतकऱ्यांच्या खूप फायद्याची योजना असणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे.त्यातच आता नवीन भर म्हणून सामूहिक शेततळे योजना राबविली जात आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत सदरील योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे.
योजनेची माहिती पुढीलप्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना आपली गट नोंदणी करावी लागते.गट नोंदणी झाल्यानंतर Mahadbt पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
योजनेची उद्दिष्टे
Samuhik Shettale Yojana
1)प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करणे.
2)संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.
3)दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
लाभार्थी निवड कशी केली जाते?
1)प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या समूहांना अनु.जाती/जमाती,महिला, दिव्यांग, व इतर शेतकरी समूह या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
2)लाभार्थी हे एकाच कुटुंबातील नसावेत,ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत.त्यांचे खाते उतारे स्वतंत्र असावेत.
3)सामूहिक शेततळे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.
4)समूहातील सर्व शेतकरी हे अल्प किंवा अत्यल्प भूधारक असावेत.
5)लाभार्थी समुहाकडे असलेल्या क्षेत्राच्या तुलनेतच शेत तळ्याची क्षमता ठरविली जाईल.
6) शेततळ्याच्या पाणी वापराबद्दल तसेच जागेबद्दल समूहातील शेतकऱ्यांमध्ये तसा सामंजस्य करार असणे आवश्यक आहे.
अनुदान किती मिळते?
Samuhik Shettale Yojana
सामूहिक शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम ही शेततळ्याच्या आकारमानावर अस्तरिकरणासहित दिली जाते.
पूर्णपणे खोदाई करण्यासाठी अस्तरिकरणासहित दिले जाणारे अनुदान खालील प्रमाणे
1)100X100X3 मीटर – 20 लाख रुपये अनुदान
2)60X60X3.1 मीटर – 7.53 लाख रुपये अनुदान
3)55X55X3 मीटर – 6.33 लाख रुपये अनुदान
4)50X50X2.7 मीटर – 5.01 लाख रुपये अनुदान
5)45X45X2.8 मीटर – 4.18 लाख रुपये अनुदान
6)40X40X3 मीटर – 3.93 लाख रुपये अनुदान
7)35X35X3 मीटर – 2.71 लाख रुपये अनुदान
8)30X30X2.8 मीटर – 2 लाख रुपये अनुदान
जमिनीच्या वर बांध घालून पाणीसाठा करावयाचे सामूहिक शेततळे साठी अस्तरिकरणासाठी दिले जाणारे अनुदान खालीलप्रमाणे
1)100X100X3 मीटर – 14 लाख रुपये अनुदान
2)44X44X5.4 मीटर – 5.56 लाख रुपये अनुदान
3)41X41X5 मीटर – 4.80 लाख रुपये अनुदान
4)34X34X4.7 मीटर – 3.39 लाख रुपये अनुदान
5)24X24X4 मीटर – 1.75 लाख रुपये अनुदान
6)14X14X3 मीटर – 0.65 लाख रुपये अनुदान
आवश्यक कागदपत्रे
1) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
2)आधार कार्ड
3)७/१२ आणि ८अ उतारा
4)मोबाईल क्रमांक
5)अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
6)हमीपत्र
अर्ज कुठे करायचा?
Samuhik Shettale Yojana
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
त्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.