Solar Pump Application
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सोलर पंप योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यासाठी महावितरण कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आले आहेत.सदरच्या लेखाच्या माध्यमातून आपण अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे,पात्रता यांसारख्या आवश्यक बाबींची माहिती जाणून घेणार आहेत.त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Table of Contents
काय आहे योजना?
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख सोलर पंपाचे वाटप केले जाणार आहे.जे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.त्या संबंधी शासन निर्णय जीआर जारी करण्यात आला आहे. यासाठी महावितरण विभागाकडून नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.ज्या पोर्टलवरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत.
कुसुम सोलर पंप योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातून कुसुम सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने आजपर्यंत ९ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे.परंतु कुसुम सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यांना सदरच्या योजनेतून लाभ देण्यात येणार नाही.राज्यात सध्या १ लाख २० हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.जे शेतकरी महावितरण कडे मागणी करतील अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
Solar Pump Application
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा (विहीर/कूपनलिका शेतात असल्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी)
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सामाईक क्षेत्र असेल तर इतर भागीदारांचे संमतीपत्र
आवश्यक पात्रता Solar Pump Apply Online
- सुरुवातीला कुठल्याही सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एका सर्व्हे नंबर गटातील फक्त एकाच शेतकऱ्याला लाभ दिला जाणार.
- लाभार्थ्यांचे गाव महाऊर्जाने प्रसिद्ध केलेल्या यादीत असेल तरच लाभ घेता येणार आहेत.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले गाव भूजल सर्वेक्षण मध्ये असणे आवश्यक आहे.जी गावे डार्क वॉटर शेड अंतर्गत आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.(Solar Pump Application)
अर्ज कुठे करायचा?
Solar Pump Application
- महावितरण मार्फत वाटप केल्या जाणाऱ्या एक लाख सोलर पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणने सोलर पंप साठी सुरू केलेल्या पोर्टलवर भेट द्यावी लागेल.त्याची लिंक खाली दिलेली आहे.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर “तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का?” हा पर्याय दिसेल तिथे Yes या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- पुढे आपला महावितरणकडे नवीन कोटेशन साठी अर्ज दाखल केलेला असेल त्या अर्जावरील ग्राहक क्रमांक टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची माहिती ओपन होईल ती सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करायची आहे.
- नंतर ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे.OTP Verified Successfully असे आपल्याला दिसेल.
हे पण वाचा:- आता शेतकऱ्यांना पीएम किसान संबंधी तक्रारीचे फक्त ३० सेकंदात उत्तर मिळणार!
- आता आपल्यामसोर नवीन पर्याय ओपन होतील तिथे आपला जिल्हा,आपला तालुका,आधार क्रमांक टाकायचा आहे.तसेच आपले गाव देखील निवडायचे आहे . जर आपले गाव सेफ व्हीलेज लिस्ट मध्ये असेल तरच आपण अर्ज करू शकणार आहेत.
- पुढे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे.आपल्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे.
- सर्वात शेवटी अर्ज दाखल करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आपल्या स्क्रीनवर लाभार्थी यशस्वीरित्या जोडला गेला आहे असा मेसेज आपल्याला दिसेल.
- आता आपल्या मोबाईल वर एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड येईल. तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून पुन्हा लॉगिन करायचे आहे.(Solar Pump Application)
- तिथे आवश्यक ती माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
- अशा प्रकारे आपण सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज सबमिट झाल्यानंतर कुसुम सोलर पंप योजने प्रमाणे आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर देण्यात येणार आहेत.तसेच आम्ही देखील वारंवार सदर योजनेच्या नवनवीन अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचवत राहणार आहेत.त्यासाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.