Today’s Havaman Andaj
महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असताना विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात २१ ते २४ जानेवारी पर्यंत चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.शिवाय नागपूर आणि वर्ध्यामध्ये देखील सरी कोसळू शकतात.
दुसरीकडे २२ जानेवारी रोजी मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते तुरळक सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच या कालावधीमध्ये राज्यातील इतर भागातील हवामान कोरडे राहू शकते.
तसेच पाऊस पडल्यानंतर किमान तापमान आणखी कमी होऊ शकते.याचाच परिणाम म्हणून थंडीचा जोर वाढू शकतो.उत्तरेकडून येणारे थंड वारे महाराष्ट्रातील थंडीसाठी पोषक ठरत आहेत.
पुढील दोन दिवसात विदर्भातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाणे येथील तापमानामध्ये चांगली घट झाली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता.तसेच रात्री कडाक्याची थंडी पडत आहे.याचा फायदा हरभरा,ज्वारी आणि गहू या पिकांना होत आहे.परंतु थंडीचा फळबाग आणि द्राक्ष पिकांवर परिणाम होत आहे.त्यामुळे द्राक्षांची वाढ मंदावण्याची शक्यता आहे त्यामुळे द्राक्षांचा गोडपणा तुलनेने कमी होतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.