शेतकऱ्यांना या ट्रॅक्टर खरेदी साठी मिळणार 90 टक्के अनुदान,पहा कुठे करायचा अर्ज?

Spread the love

Tractor Anudan Yojana
पूर्वीपासून शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला जात आहे.अगदी नांगरणीपासून पिकांची मळणी करण्यासाठी बैलांवरच अवलंबून राहावे लागत असायचे.यामध्ये शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट तसेच अधिक वेळ लागत असायचा.त्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण होत नसायची.याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर देखील होत असे.

आता मात्र तंत्रज्ञानाच्या युगात शेती करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आधीपेक्षा कमी वेळेत आणि खर्चात शेती करणे शक्य झाले आहे.विविध शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि ट्रॅक्टर सारख्या मशिनरीचा वाढलेला वापर यामुळे शेती व्यवसाय आणखीनच सोपा झाला आहे.परंतु प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही.त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आज देखील परिस्थितीशी झगडावे लागत आहे.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी साठी सरकारच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जात आहे.मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने ९० टक्के अनुदान वितरित करण्यात येत आहे.यासाठी सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.त्यामुळे आपण या लेखाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी अनुदान मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा?आणि कोणकोणते शेतकरी पात्र आहेत याची माहिती जाणून घेणार आहेत.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता 3.50 लाख रुपयांचा कृषी सोलर पंप मिळणार फक्त 12 हजार रुपयांत,अर्ज कुठे करायचा?जाणून घ्या सविस्तर!

किती एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी मिळणार अनुदान?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान दिले जाते.या योजनेच्या अंतर्गत ९ एचपी ते १८ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.तसेच यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जात नाही.

मिनी ट्रॅक्टर खरेदी अनुदानाचे स्वरूप

समाज कल्याण विभागाकडून मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही.या योजनेमध्ये प्रामुख्याने बचत गटांनाच अनुदान वितरित केले जाते.तसेच या योजनेच्या अंतर्गत नवबौध्द समाजातील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या बचत गटासाठीच अनुदान दिले जाते.पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्तीत जास्त ९० टक्के अनुदान दिले जाते.तसेच ट्रॅक्टरच्या उपकरणांवर जास्तीत जास्त सव्वा तीन लाख रुपयांपर्यंत या योजनेच्या अंतर्गत अनुदान वितरित केले जात आहे.

कोणते शेतकरी पात्र असणार?

•महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असलेला नवबौध्द समाजातील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी बचत गट

•बचत गटामध्ये नवबौध्द समाजातील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के असणे आवश्यक आहे.

•पुरुष आणि महिला बचत गट या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

•नवबौध्द समाजातील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील पुरुष तसेच महिला बचत गटांची अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे.

•सर्वसामान्य तसेच नवबौध्द समाजातील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही.

अर्ज कुठे करायचा?

मिनी ट्रॅक्टर खरेदी साठी ९० टक्के अनुदान मिळवण्यासाठी नवबौद्ध समाजातील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील बचत गटांना संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करायचा आहे.ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे.जालना जिल्ह्यातील बचत गटांना या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी २० जानेवारी २०२४ ही अंतिम मुदत असणार आहे.बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ही मुदत वेगवेगळी असू शकते त्यामुळे संबंधित जिल्ह्यांच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क करून इच्छुक तसेच पात्र शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment