Travel Allowance
महाराष्ट्र राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने राज्यातील महानगर परीक्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्य ठिकाणापासून ते निवास ठिकाणापर्यंत जाण्यासाठी मोफत बसने प्रवास करण्याची योजना सुरू केली होती.परंतु आता महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील मुंबई महानगरपालिका व इतर महानगरपालिका हद्दीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मोफत प्रवासाऐवजी वाहतूक भत्ता देण्याचा शासन निर्णय दि.२१/१०/२०२२ रोजी निर्गमित केला आहे.
परंतु बृहन्मुंबई पोलीस दलातील सर्व कार्यरत अधिकारी/अंमलदार यांना बेस्ट बसमधून निःशुल्क प्रवास (Travel Allowance) करण्याची सुविधा दिनांक १/६/२०२२ पासून बंद करण्यात आलेली आहे.
त्यामुळे त्यांना वाहतूक भत्ता दिनांक १/६/२०२२ रोजी पासून देण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची मोफत प्रवास सुविधा दिनांक १/६/२०२२ पासून बंद करण्यात आल्याने सदरहू वाहतूक भत्ता दिनांक १/६/२०२२ पासून देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका हद्दीतील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यापुरता मर्यादित असेल.
हे पण वाचा:- आता एसटीमध्ये प्रवाशांना मिळणार डिजिटल तिकीट जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
शासन निर्णय
१.यापुढे कोणत्याही महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने पोलिस अधिकारी/कर्मचारी यांना मोफत प्रवास करता येणार नाही.
२.कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जाणार नाही.
३.ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे,त्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जाणार नाही.
४.रजा,प्रशिक्षण,दौरा इत्यादी कारणांमुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता दिला जाणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.