पोलिस भरती व्हायचंय ना?तर मग लागा तयारीला, ही संधी अजिबात सोडू नका,तब्बल 60244 रिक्त पोलिस पदांची मेगा भरती! UP Police Bharti 2023

Spread the love

UP Police Bharti 2023
सरकारी नोकरीच्या तसेच विशेष करून पोलिस भरतीचा अभ्यास करणाऱ्या उमेवारांना एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून तब्बल ६०२४४ रिक्त पोलिस पदांची मेगा भरती राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेसाठी इतर राज्यातील उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असणार आहे.

या पोलिस भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता,कागदपत्रे,एकूण रिक्त पदांचा तपशील या बाबतची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊयात.उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

UP Police Bharti 2023

संस्थेचे नाव – उत्तर प्रदेश पोलिस

एकूण रिक्त पदे – ६०२४४ पदे

रिक्त पदांचा तपशील

अनुसूचित जाती प्रवर्ग(SC) – १२६५० पदे
अनुसूचित जमाती प्रवर्ग(ST) – १२०४ पदे
इतर मागास वर्ग(OBC) – १६२६४ पदे
आर्थिक मागास प्रवर्ग(EWS) – ६०२४ पदे
सर्वसाधारण प्रवर्ग(General) – २४१०२ पदे

हे पण वाचा:- १०वी पास असणारे जरा इकडे लक्ष द्या, एस.टी.महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी,इथे करा अर्ज!

नियुक्तीचे ठिकाण – उत्तर प्रदेश राज्य

आवश्यक शैक्षणिक पात्रता

भारताच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता १२वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पुरुष उमेदवार – १८ ते २२ वर्षे (पुरुष उमेदवाराची जन्म तारीख २ जुलै २००१ ते ०१ जुलै २००५ च्या दरम्यान असावी.)

महिला उमेदवार – १८ ते २५ वर्षे (महिला उमेदवाराची जन्म तारीख ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००५ च्या दरम्यान असावी.)

परीक्षेचे स्वरूप

ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.ही परीक्षा एकूण ३०० गुणांची असेल ज्यामध्ये १५० प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असतील.चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण कमी केले जाणार आहेत.परीक्षेमध्ये मुख्य चार विषय असतील.
१.सामान्य ज्ञान
२.सामान्य हिंदी
३.संख्यात्मक आणि मानसिक क्षमता
४.मानसिक योग्यता,बुद्धिमत्ता आणि तार्किक क्षमता

अर्ज शुल्क – सर्व प्रवर्गांसाठी ४००/- रुपये

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

२७ डिसेंबर २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत

१४ जानेवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात PDF📝- येथे क्लिक करा

How to apply for UP Police Bharti 2023

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 जानेवारी 2024 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

     🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore,the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment