UPI Credit Payment:- तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत,तरीसुद्धा पैसे काढता येणार,कसे ते जाणून घ्या!

Spread the love

UPI Credit Payment


नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती.या योजनेअंतर्गत 10 वर्षांवरील नागरिकांसाठी बँकेत जन धन खाते उघडता येत आहे.ही योजना सुरू होऊन आता 7 वर्षे पूर्ण झालेली आहेत.

UPI Credit Payment

प्रधानमंत्री जनधन योजनेत योजनेत सहभागी होण्याकरिता खातेदाराला बँकेत खाते उघडावे लागते.ज्या व्यक्तींचे या योजनेच्या अंतर्गत बँकेत खाते आहे त्यांना बँकेकडून डिमांड ड्राफ्ट ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तुम्हालाही डिमांड ड्राफ्टची सुविधा मिळवायची असल्यास प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत खाते उघडावे लागते.

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नवीन घोषणा केली आहे.जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसले तरी देखील तुम्ही पैसे काढू शकणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्री सॅक्शन्ड क्रेडिट लाईन (Pre Sanctioned Credit Line) ही योजना सुरू केली आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसले तरी देखील तुम्ही पैसे काढू शकणार आहेत.

खात्यात पैसे नसल्यास कसे काढू शकणार?
UPI Credit Payment

या सुविधेच्या अंतर्गत UPI पेमेंट बेस्ड बँक ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना क्रेडिट प्रदान करणार आहे.बँक तुम्हाला जेवढे क्रेडिट देणार आहे तेवढीच क्रेडिट रक्कम तुम्ही काढू शकणार आहेत.बँकेने तुम्हाला दिलेली क्रेडिट रक्कम तुम्ही वेळेमध्ये परतफेड केल्यास तुमची क्रेडिट वाढणार आहे.त्यामुळे तुम्हाला परत अधिकची क्रेडिट वाढून मिळणार आहे.

हे पण वाचा:- राज्यातील नागरिकांना दिवाळीत भेटणार आनंदाचा शिधा,फक्त 100 रुपयांत मिळणार या सहा वस्तू

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व शेड्युल बँकांना या योजनेच्या संदर्भात आदेश दिले आहेत.ग्राहकाच्या खात्यात झिरो बॅलन्स असला तरी देखील त्यांना ही सुविधा मिळणार आहे.परंतु या योजनेमध्ये पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि ग्रामीण बँकांचा समावेश नसणार आहे.त्यामुळे जे ग्राहक बँकेच्या UPI पेमेंट सिस्टमचा वापर करत असतील त्यांना ही सुविधा मिळणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment