UPI Payment Limit
अलिकडील काळामध्ये फोन पे आणि गूगल पे सारख्या यूपीआय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.यूपीआय च्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे असल्याने याची लोकप्रियता अजून वाढत चालली आहे.भारतामध्ये २०२३ या संपूर्ण वर्षात यूपीआय पेमेंट ची संख्या एक अब्जाच्या घरात गेली आहे.
२०२३ या एका वर्षात यू पी आय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जवळपास ११८ अब्ज रुपयांची ऑनलाईन पद्धतीने देवाण घेवाण करण्यात आली आहे.२०२२ च्या तुलनेत यू पी आय वापर कर्त्यांची संख्या ६० टक्क्याने वाढली आहे.यावरून यूपीआय पेमेंटची किती क्रेझ आणि ट्रेंड आहे हे लक्षात येते.
भारताच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय पेमेंट व्यवहार करण्यासाठी काही मर्यादा घातल्या आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत होत्या.परंतु नवीन वर्षाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट बाबत एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे.ज्यामध्ये यूपीआय च्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करण्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
सरकारने वाढविली ऑनलाईन पेमेंटची मर्यादा
केंद्र सरकारने अलीकडेच एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.सुरुवातीला यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एका दिवसाला एक लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आलेली होती.परंतु आता एनपीसीआय च्या नवीन गाईडलाईन्स नुसार ही मर्यादा पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे तुम्ही हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांची फी भरण्यासाठी एका दिवसात यूपीआयच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत. १० जानेवारी पासून हा नवीन नियम लागू होणार आहे.
परंतु इतर व्यापारी आणि ग्राहकांना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयच्या माध्यमातून एका दिवसाला एक लाख रुपये इतकी पेमेंट मर्यादा असणार आहे.त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंतची ऑनलाईन पेमेंट मर्यादा ही फक्त हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठीच लागू असणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट द्या.