ZP Scheme 2023:- या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार४ शेळी व 1 बोकड आणि मिल्किंग मशीनचे वाटप,आजच अर्ज करा!

Spread the love

ZP Scheme 2023

ZP Scheme 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टल वर आपले स्वागत आहे.आज आम्ही तुम्हाला एका जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळी वाटप अनुदानाची माहिती सदर लेखामधून देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया जिल्हा परिषदेच्या एका भन्नाट योजनेची माहिती.

काय आहे योजना?

2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद उपकर योजनेमधून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना 75% अनुदानावर 4 शेळ्या आणि 1 बोकड वाटप करणे व पशुपालक धारकांना 50% अनुदानावर मिल्किंग मशीनचे पुरविणे ही योजना राबविली जात आहे.

अर्ज कुठे करायचा?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच पशुपालक यांनी आपले अर्ज आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात दिनांक 25 सप्टेंबर पूर्वी जमा करावयाचे आहेत.ZP Scheme 2023

सर्व लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्याची 8 दिवसांच्या आत पडताळणी करून पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल.वरील नमूद तारखेनंतर आलेल्या अर्जांचा कुठलाही विचार केला जाणार नाही.

हे पण नक्की वाचा:- आता शेत तळ्यासाठी मिळणार 3 लाख 39 हजार रुपये अनुदान

सदरची योजना ही जिल्हा उपकरातून राबविली जात आहे. लाभार्थ्यांना सदर अर्जाचा नमुना जिल्हा परिषद सदस्य किंवा तालुका पदाधिकारी यांच्याकडे देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही दैवी चिठ्ठी द्वारे करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व शेतमजुरांनी तसेच शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

ZP Scheme 2023
1)फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
2)दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
3)७/१२ व ८अ उतारा आणि ग्रामपंचायत मधील नमुना नंबर ८
4)प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
5)जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
6)बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
7)रोजगार – स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत
8)ग्राम पंचायत यांचा अपत्य दाखला
9)शौचालय वापरत असल्या बाबतचा ग्राम पंचायत यांचा दाखला
10)रेशन कार्ड सत्यप्रत

कोणत्या जिल्हा परिषदेमार्फत योजना राबविली जात आहे?

75% अनुदान तत्वावर 4 शेळ्या व 1 बोकड तसेच 50% अनुदानावर मिल्किंग मशीन वाटप योजना ही जिल्हा परिषद सोलापूर च्या उपकरातून राबविली जात आहे. सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतमजूर तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी केले आहे.ZP Scheme 2023

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment