Pik Vima 2023
आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील १६ जिल्ह्यातील ३५ लाख ०८ हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.Mid Adversity Survey (अंतरिम नुकसानीचे अहवाल) व त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील ३५ लाख ०८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १ हजार ७०० कोटी ७३ लाख एवढी अग्रीम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या प्रमाणे आजपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने या वर्षी प्रथमच खरीप पिकांसाठी १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना(Pik Vima 2023) राबविली होती.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून ही योजना यशस्वी करून दाखविली.Pik Vima 2023
राज्यात खरीप हंगामात हवामानातील असमतोल,कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशी स्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीकविमा मिळणे तसेच तो वेळेत मिळावा याकरिता कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने आग्रही होते.त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे.
तरीदेखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्या पिकांच्या नुकसानीच्या अपिलात गेल्या आहेत. त्यामुळे सध्या संबंधित जिल्ह्यातील शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.परंतु पीक विमा कंपन्यानी केलेल्या अपिलावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे.
हे पण वाचा:- या जिल्ह्यातील सर्वच 57 मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार 218 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा!
कृषी मंत्री धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनीही वेळोवेळी बैठका घेऊन अग्रीम पीक विम्याचा(Pik Vima 2023) तिढा सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार हेही याबत सातत्याने आग्रही होते.
आज पहिल्या टप्प्यातील अग्रीम पीक विम्याच्या १ हजार ७०० कोटी रुपये रकमेच्या वितरणास सुरुवात होत आहे. त्याचबरोबर अपिलांचे निकाल व अन्य बाबी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित ठिकाणच्या विम्याचाही प्रश्न मार्गी लागेल व लाभार्थी संख्या आणि लाभाच्या रकमेत देखील वाढ होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.