Crop Insurance:- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा आदेश,या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पीक विमा !

Spread the love

Crop Insurance

Crop Insurance
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.या वर्षी संपूर्ण राज्यात सरासरीच्या कमी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यातील खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

हेच आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून अग्रिम पीक विमा मिळवा यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत.राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळावा यासाठी पीक विमा कंपनीला आदेश दिले आहेत.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये 25 टक्के अग्रिम पीक देण्याचे आदेश पीक विमा कंपनीला दिले आहेत.त्यामुळे आता शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शेतकरी हिताचा निर्णय

सरासरी पेक्षा कमी झालेला पाऊस,पिकांचे कमी झालेले उत्पन्न शेतकऱ्यांसाठी अडचणींचा विषय ठरत आहे.त्यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक आणि नैराश्याच्या गर्तेत ढकलला जात आहे.परंतु अशातच शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा देण्याचा निर्णय शेतकरी हिताचा आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा:- अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरू,आता 15 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येणार!

आता जरी हा निर्णय बीड जिल्ह्यापुरता मर्यादित असला तरी सुद्धा येत्या काही काळामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यामधे देखील हा निर्णय लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल.तसेच त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे.

कोणकोणत्या पिकांचे नुकसान झाले आहे?

बीड जिल्ह्यात सुमारे 10 लाख शेतकरी आहेत.बीड जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन,उडीद,बाजरी,कापूस,तूर,तीळ,जवस,मूग इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यात अंदाजे 500 कोटी रुपये किमतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष प्रयत्न

राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळावा याकरिता वारंवार प्रयत्न केले.पीक विमा कंपनीना शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.राज्याचे कृषी विभागाचे हवे ते योगदान देण्याचे देखील प्रयत्न केले.या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळण्यास मदत झाली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment